लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारांमुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंदुकीचा परवाना मिळावा तसेच असे अन्याय होणार नाही यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
निवेदनात म्हटले आहे की, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून तक्रार नोंदविण्यापासून ते न्याय मिळेपर्यंत संघर्ष करावा लागतो तर काही ठिकाणी महिला मूग गिळून गप्प बसतात. अशा घटनांमध्ये महिलांना न्याय मिळेलच असे नाही, त्यामुळे महिलांनी अधिक सकारात्मक व सक्षम राहावे यासाठी रितसर बंदुकीचा परवाना द्यावा. यावेळी शहराध्यक्ष संजय गुदगे, विमल पोखर्णीकर, भारत कोकाटे, प्रभाकर माने, डॉ. आनंद गुरव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------
इंदुमती गणेश