शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

माहिती तंत्रज्ञानातील वैश्विक झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:53 AM

मूळ गाव सांगली. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण सांगलीमध्येच. अभ्यासाबरोबरच बॅडमिंटन, कथ्थकमध्येही रस. २०-२२ वर्षांपूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी संगणक क्षेत्रामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्या अध्यपनासाठीही जात होत्या. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ‘प्रकल्प मार्गदर्शक’ म्हणून त्यांनी काम केले.

- समीर देशपांडे, कोल्हापूर

मूळ गाव सांगली. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण सांगलीमध्येच. अभ्यासाबरोबरच बॅडमिंटन, कथ्थकमध्येही रस. २०-२२ वर्षांपूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी संगणक क्षेत्रामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्या अध्यपनासाठीही जात होत्या. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ‘प्रकल्प मार्गदर्शक’ म्हणून त्यांनी काम केले. याच दरम्यान त्यांनी ‘रोबोटिक्स’, ‘अ‍ॅँटी व्हायरस’, ‘ब्रिक्स गेम’ अशी सॉफ्टवेअर्स तयार केली. याच दरम्यान ‘वायटुके’मुळे संगणक प्रणालींना येणाऱ्या अडथळ्यांबाबत त्यांनी ‘निओ’ कंपनीसाठी तज्ज्ञ म्हणून काम केले.

आपले संगणकीय ज्ञान हे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुलभता आणण्यासाठी उपयुक्त ठरावे, अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी वैद्यकीय क्षेत्राला पूरक अशी सॉफ्टवेअर्स विकसित करण्याचा निर्णय घेतला. आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. लंडन विद्यापीठातून त्याला पूरक असे शिक्षण घेतले. सायबर लॉमधील डिप्लोमा, शिवाजी विद्यापीठातून कायद्याची पदवी, एम.सी.एस.चे शिक्षण घेत त्यांनी या क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखविण्यासाठीची पूर्ण पूर्वतयारी केली. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आरोग्य क्षेत्रामध्ये अग्रगण्य कंपन्यांच्या माध्यमातून सात देशांमध्ये सेवा देणाºया याच या माहिती तंत्रज्ञान उद्योजिका अश्विनी दानिगोंड. ‘मनोरमा इन्फोसोल्युशन्स’च्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अमेरिकेसारख्या देशांचा बोलबाला असताना, भारतीय मनुष्यबळाला विदेशामध्ये मागणी असताना अश्विनी दानिगोंड यांनी मात्र भारतामध्येच, महाराष्ट्रातूनच आणि तेही कोल्हापूरमधूनच हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि २00२ साली या कंपनीची स्थापना केली. आरोग्य क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना राबवून त्याचा थेट फायदा रुग्णालये, डॉक्टर्स, मेडिकल्स आणि रुग्ण या सर्वांनाच मिळावा, यासाठी त्यांनी या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी चार कर्मचारी कार्यरत होते. आज १६ वर्षांनंतर कंपनीमध्ये ३६0 अभियंते, डॉक्टर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेत यावर त्यांच्या कंपनीने लक्ष केंद्रित केले.

दर्जेदार कामाच्या जोरावर कंपनी एक-एक प्रगतीचा टप्पा पूर्ण करीत असताना अश्विनी या हा संपूर्ण कारभार आपल्या नागाळा पार्कमधील कार्यालयामधून सांभाळतात. आपल्या कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशविदेशांतील रुग्णालयांना ४८ प्रकारच्या सेवा सुलभपणे देता येतात. त्यामुळे या कंपनीचा या क्षेत्रामध्ये बोलबाला झाला आहे. या दर्जेदार कामगिरीमुळेच आज केनिया, दुबई, अबुधाबी, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर या देशांना ही कंपनी सेवा देत आहे. कोल्हापूर येथे या कंपनीचे मुख्यालय असून पुणे, मुंबई, दिल्ली, बंगलोर, दुबई, सिंगापूर येथेही कार्यालये कार्यरत आहे.भारत आणि विदेशांतील १६00 रुग्णालयांसाठी या कंपनीने सेवा पुरविली असून त्यासाठी जगभर अश्विनी दानिगोंड यांची भ्रमंती सुरू असते. सध्या मुंबई महापालिकेच्या ४00 रुग्णालयांसाठी त्या सेवा देत असून, हा आशिया खंडातील सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार आहे. कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. आरोग्य क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानाच्या या प्रगतीची, रुग्णांना मिळणाºया सुलभ सेवांची दखल घेत अश्विनी यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील व्यासपीठांवर मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात आले आहे.नुकत्याच बु्रसेल्स येथे झालेल्या युरोप, इंडिया बिझनेस समिटमध्ये सहभागी झाले. गतवर्षी ब्रिटनमध्ये झालेल्या इंडिया टेक्नॉलॉजी समिटमध्ये मला मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. दक्षिण आफ्रिका, केनिया, बंगलोर, पुणे मुंबई येथेही मझाी व्याख्याने झाली आहेत.- अश्विनी दानीगोंडत्यांच्या या योगदानाची दखल घेत चॅनेल वर्ल्ड प्रीमियर १00, नॅसकॉम, हेल्थकेअर लीडर्स फोरम अवॉर्ड, एक्सलन्स अवॉर्ड, मॅक्सेल अवॉर्ड यासारखे प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर १८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारे असे हे अश्विनी दानिगोंड यांचे नेतृत्व निश्चित सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारे आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर