शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मराठ्यांचे संघटन गोवा, कर्नाटकातही वाढविणार : वसंतराव मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 1:08 AM

प्रवीण देसाई । मराठा महासंघाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांपर्यंत मराठ्यांचे संघटन उभारण्याचे काम केले आहे. हे काम आता सीमेवरील ...

प्रवीण देसाई ।मराठा महासंघाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांपर्यंत मराठ्यांचे संघटन उभारण्याचे काम केले आहे. हे काम आता सीमेवरील कर्नाटक व गोवा राज्यांतही वाढविणार आहे, असा विश्वास अखिल भारतीय मराठा महासंघाचे नूतन राष्टÑीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या आगामी वाटचालीविषयी त्यांची प्रश्नोत्तर स्वरूपात घेतलेली चर्चेतील मुलाखत.प्रश्न : निवडीनंतर आता पुढे कशा पद्धतीने काम करणार?उत्तर : माथाडी कामगार नेते कै. अण्णासाहेब पाटील यांनी १९८० मध्ये मराठा महासंघाची स्थापना करून मराठ्यांचा झंझावात निर्माण केला. त्यानंतर अ‍ॅड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटना कार्यरत राहिली. संघटनेकडे मराठ्यांची मातृसंस्था म्हणून पाहिले जाते. पश्चिम महाराष्टÑ हा मराठाबहुल भाग आहे. या ठिकाणी संघटनेचे इतके मोठे पद गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मिळाले नव्हते. ते आपल्या निमित्ताने मिळाले असून, या पदाच्या माध्यमातून मराठा समाजाचे संघटन करण्याचे काम जिल्ह्याबाहेर राज्यभर व राज्याबाहेर कर्नाटक व गोवा राज्यांतही करणार आहे.प्रश्न : मराठा आरक्षणाबाबत सद्य:स्थिती, पुुढील दिशा काय राहणार?उत्तर : राज्यभरात लाखोंच्या संख्येने निघालेले मराठा समाजाचे मूक मोर्चे व मागासवर्ग आयोगाच्या अहवालामुळे समाजाला आरक्षण मिळाले. ते टिकविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन उच्च न्यायालयात बाजू मांडली. त्याप्रमाणेच सर्वाेच्च न्यायालयातही बाजू मांडण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. या ठिकाणी तज्ज्ञ वकिलांची फौज उभी करावी यासाठी मराठा महासंघाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. आरक्षणाबरोबरच समाजाची शैक्षणिक उन्नती होण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या नावे ‘सारथी’ संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासारख्या संस्था स्थापन करण्यास सरकारला भाग पाडले. या संस्थांच्या माध्यमातून मराठा युवा पिढीला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी या संस्था कशा पद्धतीने सक्षम होत्या, या दृष्टीने प्रयत्न केले जातील.‘मराठा भवन’ची उभारणी करणारगेली चार वर्षे राज्य शासनाकडे भवनच्या जागेसाठी प्रस्ताव प्रलंबित आहे. आता पुन्हा नव्याने मराठा भवनसह वसतिगृहाकरिता जागा मिळविण्याकरिता पाठपुरावा केला जाईल. समाजाचा सहभाग लाभल्यास भवनसाठी स्वत:च जागा खरेदी करण्याचा प्रयत्न राहील.‘सारथी’ उपमुख्य केंद्र कोल्हापुरात !मराठा समाजातील विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी ‘सारथी’ ही संस्था शासनाने स्थापन केली. यावेळी या संस्थेचे कोल्हापुरात उपमुख्यकेंद्र होण्यासाठी मागणी केली होती. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे मुळीक यांनी सांगितले.सीमा परिषदही कोल्हापुरातसीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. गेली ६० वर्षे सीमा प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले असून, सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कोल्हापूरकरांनी सीमावासीयांना मोठी साथ दिली आहे. तीच भावना ठेवून त्यांना इथून पुढेही सहकार्य करून प्रसंगी सीमा परिषद कोल्हापुरात घेऊ, असे मुळीक यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कोल्हापूरचे १४ हजार खटले निर्गतीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.