कोल्हापूर : अकरावी प्रवेशासाठी यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया १६ जूनपासून सुरू होईल. अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून समितीची तयारी सुरू आहे. या अंतर्गत अर्ज वितरण केंद्रे निश्चित केली असून, प्रवेशाचे वेळापत्रक, अर्ज छपाई निविदा, आदी मुद्द्यांबाबत समितीत शनिवारी (दि. ६) झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. कोल्हापूर शहरात मराठी व इंग्रजी माध्यमांची एकूण ३२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता १३ हजार ५०० इतकी आहे. दहावीच्या टक्केवारीवर प्रवेशाची सूत्रे निश्चित केली असल्याने समितीकडून वाढीव प्रवेश क्षमतेचे नियोजन केले जाणार आहे. दहावीच्या गुणपत्रिका मिळाल्यानंतर १६ जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. (प्रतिनिधी)गेल्या वर्षीप्रमाणे यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, चुका टाळता येतील. ६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची, महाविद्यालयांची माहिती मिळेल. - एम. के. गोंधळी, उपसंचालकआतापर्यंत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आमच्या कॉलेजमध्ये अर्ज स्वीकृती आणि तक्रार निवारण केंद्र होते. यंदा मुख्य केंद्राला प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी दिली. प्रक्रिया नियोजन समितीची पहिली बैठक शनिवारी झाली. - जे. बी. पिष्टे, प्राचार्य, गोखले कॉलेज
अकरावी प्रवेशाचे मुख्य केंद्र गोखले कॉलेज
By admin | Published: June 08, 2015 12:11 AM