गडहिंग्लज : २० लाख लिटर्स दूध संकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अधिकारी व सुपरवायझर यांनी हातात हात घालून काम करावे,अशी सूचना 'गोकुळ'चे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले. लिंगनूर कसबा नूल ( ता. गडहिंग्लज) येथील 'गोकुळ'च्या चिलिंग सेंटरला नूतन संचालक नविद मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.नविद मुश्रीफ म्हणाले, अधिकाऱ्यांनी दूध उत्पादकांना महालक्ष्मी पशुखाद्याची माहिती द्यावी व जास्तीत जास्त पुरवठा करण्यासंदर्भात आवाहन करावे.यावेळी सहाय्यक व्यवस्थापक (संकलन)रविंद्र करंबळे, सहाय्यक व्यवस्थापक (पशुसंवर्धन ) डॉ. अविनाश जोशी, सहाय्यक व्यवस्थापक (डेअरी) विजय कदम, दूध संकलन अधिकारी पी. एस. पाटील, अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी उपस्थित होते.
'गोकुळ'च्या अधिकाऱ्यांनी हातात हात घालून काम करावे : नविद मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 11:22 AM
GokulMilk Kolhapur : २० लाख लिटर्स दूध संकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अधिकारी व सुपरवायझर यांनी हातात हात घालून काम करावे,अशी सूचना 'गोकुळ'चे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले. लिंगनूर कसबा नूल ( ता. गडहिंग्लज) येथील 'गोकुळ'च्या चिलिंग सेंटरला नूतन संचालक नविद मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.
ठळक मुद्दे'गोकुळ'च्या अधिकाऱ्यांनी हातात हात घालून काम करावे : नविद मुश्रीफ गडहिंग्लज चिलिंग सेंटरला भेट, बैठकीत सूचना