कोल्हापूर: सर्वसाधारण गटात क्रॉस व्होटींगमुळे गोकूळच्या मतमोजणीत मोठा व्यत्यय येत असून मतमोजणीलाही उशीर होत आहे. पॅनेल टू पॅनेल ६० टक्के तर क्रॉस व्होटींग ४० टक्के होत असल्याने बाहेर पाऊस पडत असतानाही मोजणी यंत्रणेसह दोन्ही आघाडीचे कार्यकर्ते घामाघुम झाले आहेत. सत्ताधारी आघाडीतील चेतन नरके व अंबरीश घाटगे हे दोघेच आघाडीवर आहेत.सकाळी राखीव गटातील पाचही निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी तीन पासून सर्वसाधारण गटातील मोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीपासून विरोधी शाहू शेतकरी आघाडीने सत्ताधारी आघाडीवर मात देण्यास सुरुवात केली असून पाचवरुन आघाडी संध्याकाळी चौदापर्यंत गेली. सत्ताधारी आघाडीचे चेतन नरके व अंबरीश घाटगे हे दोघेच आघाडीवर असल्याचा पाच पर्यंतचा कल होता.दरम्यान सर्वसाधारणच्या नऊ फेऱ्या होणार असून आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या आहेत. यात विरोधी आघाडीने निर्विवाद आघाडी घेतल्याने सत्ताधारी आघाडीत निरव शांतता पसरली आहे. क्रॉस व्होटींगमुळे अजूनही निकाल धक्कादायक लागणार असल्याने शेवटपर्यंत कांहीही सांगता येत नसल्याने धाकधूक वाढली आहे.
gokul Result : क्रॉस व्होटींगमुळे अजूनही निकाल धक्कादायक लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 5:03 PM
gokukl Result : सर्वसाधारण गटात क्रॉस व्होटींगमुळे गोकूळच्या मतमोजणीत मोठा व्यत्यय येत असून मतमोजणीलाही उशीर होत आहे. पॅनेल टू पॅनेल ६० टक्के तर क्रॉस व्होटींग ४० टक्के होत असल्याने बाहेर पाऊस पडत असतानाही मोजणी यंत्रणेसह दोन्ही आघाडीचे कार्यकर्ते घामाघुम झाले आहेत. सत्ताधारी आघाडीतील चेतन नरके व अंबरीश घाटगे हे दोघेच आघाडीवर आहेत.
ठळक मुद्दे सर्वसाधारण गटात ६० टक्के पॅनेल टू पॅनेल मतदानक्रॉस व्होटींगमुळे अजूनही निकाल धक्कादायक लागणार