कोल्हापूर: गोकूळ दूध संघाच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर विरोधी आघाडी ११ विरुध्द सत्ताधारी आघाडी ५ असे बलाबल झाले आहे.
विरोधी आघाडीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, के.पी.पाटील यांचे चिरंजीव रणजीत पाटील, संजय घाटगे यांचे चिरंजीव अंबरीश घाटगे , आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत चुयेकर, खासदार संजय मंडलीक यांचे चिरंजीव विरेद्र मंडलीक, माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे मातब्बर आघाडीवर आहेत. तर विद्यमान रवींद्र आपटे, दीपक पाटील, सदानंद हत्तरकी हे पिछाडीवर आहेत. त्यांना अनुक्रमे ५९४ व ५६६, ५३२ अशी मते आहेत.तिसऱ्या फेरीअखेर मिळालेली सर्वाधिक मतेसत्ताधारी: अंबरीश घाटगे ६९२, बाळासो खाडे ६९०, चेतन नरके ६६१, उदय पाटील ६३५, रणजित पाटील मुरगुडकर ६०७ हे आघाडीवर आहेत.विरोधी: अरुण डोंगळे ७३३, अभिजित तायशेटे ७३०, विश्वास नारायण पाटील ७१९, अजित नरके ७१२, शशिकांत पाटील चुयेकर ७१२, किसन चौगले ७११, नविद मुश्रीफ ७११, रणजित पाटील ६९५, नंदुकुमार ढेगे ६८७, बाबासाहेब चौगले ६८४, कर्णसिह गायकवाड ६७८, प्रकाश पाटील ६३५, एस.आर.पाटील ६३२, विद्याधर गुरबे ६०७, विरेंद्र मंडलीक ६०५, महाबळेश्वर चौगुले ५९९