शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

Kolhapur: परराज्यातील म्हैस खरेदीसाठी ‘गोकुळ’चे ४० हजार अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:17 PM

वासरू संगोपनसह इतर अनुदानातही भरघोस वाढ

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने परराज्यातील म्हैस खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात तब्बल १० हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता, अनुदानापोटी ४० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली. ही योजना १२ सप्टेंबर २०२३ नंतर खरेदी केलेल्या म्हशींसाठी असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.अध्यक्ष डोंगळे म्हणाले, संघाने २० लाख लीटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, खास करून म्हैस दूध संकलनात वाढीसाठी कृती आराखडा तयार केला असून त्यात वैरण विकास, जातिवंत म्हैस खरेदी, जातिवंत मादी वासरू संगोपन, कृत्रिम रेतन कार्यक्रम यावर भर देण्यात आला आहे. संघाच्या म्हैस दूधसाठी मुंबई, पुणे कोकण तसेच इतर शहरात मागणी वाढत आहे. म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.म्हशींचा भाकड काळ कमी व्हावा तसेच गोठ्यात तयार झालेल्या पाड्या व रेड्यांना संतुलित आहार मिळावा या उद्देशाने देय अनुदानातील काही रक्कम पशुआहाराच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम संस्थेच्या दूध बिलातून रोख स्वरूपात देण्याचे संचालक मंडळाने निश्चित केले आहे.

असे मिळणार अनुदान ..

  • हरियाणा (मुऱ्हा, बन्नी, मेंढा) : ४० हजार
  • गुजरात (मेहसाना, जाफराबादी) : ३५ हजार

इतर अनुदानात केलेली वाढ..

  • जातिवंत मादी वासरू संगोपन योजनेतंर्गत जातिवंत रेडीसाठी दोन वेतासाठी २७ हजार अनुदान.
  • जातिवंत पाडीसाठी दोन वेतासाठी साडे पाच हजार अनुदान
  • वैरण विकास कार्यक्रमातंर्गत वैरण पिके घेण्यासह सायलेजसाठी ३५ टक्के अनुदान
  • ट्रॅक्टर ऑपरेट बेलिंग मशीन खरेदीसाठी २५ हजार अनुदान
  • वाळलेली वैरण (कडबा कुट्टी, गव्हाचे काड, तूर कुट्टी ) खरेदीसाठी १ हजार अनुदान
  • १ टन क्षमतेची सायलेज बॅगेसाठी २५ टक्के अनुदान
  • मुक्त गोठा सुधारित अनुदान १५ हजार
  • प्रस्ताव सादर करताच १० हजार रुपये उत्पादकांनी म्हैस खरेदी प्रस्ताव सादर केल्यानंतर वाहतूक खर्चा पोटी तात्काळ १० हजार संस्थेच्या दूध बिलातून दिले जाणार. 
  • खरेदी केल्यानंतर किंवा व्याल्यानंतर १५ हजार रुपयांचे पशुआहार पॅकेज देणार. तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर हरियाणा म्हशीसाठी १५ हजार तसेच गुजरात म्हशीसाठी १० हजार दूध बिलातून अनुदान देणार.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ