खोची : गोकुळ दूध संघ सहकारातील नामवंत संघ आहे. ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हा संघ आधारवड आहे. या संघाला हातकणंगले तालुक्यातून जास्तीत जास्त दूध पुरवठा करण्यासाठी सहकार्य केले जाईल. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन रुपये दूध दरवाढ करण्याचे आश्वासन लगेचच पूर्ण केले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली दूध संघांचा नावलौकिक वाढून आदर्शवत लोकाभिमुख कारभार होईल, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.
गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विश्वास पाटील व संचालकपदी निवड झाल्याबद्दल शशिकांत पाटील चुयेकर यांचा सत्कार आमदार राजू आवळे यांच्या हस्ते महात्मा फुले सूतगिरणी कार्यस्थळावर करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
विश्वास पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघ म्हशीच्या दुधाचे संकलन वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. पहिल्याच टप्प्यात त्यास गती मिळत आहे. हातकणंगले तालुक्यातूनही म्हैशीच्या दुधाचा जास्त पुरवठा व्हावा यासाठी दूध संस्थांना सहकार्य केले जाईल.
यावेळी बाजार समितीचे सभापती चेतन चव्हाण, वडगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पाटील, रामकृष्ण लोकरे, रणजित निकम, जावेद कुरणे, आण्णा शिंदे, राजहंस भुजिंगे, मोहसीन पोहाळे, सूरज जमादार, स्वरूप शिंदे, शरद कांबळे, सतीश लोहार, संतोष पाटील, मुकुंद पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी-गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील यांचा सत्कार आमदार राजू आवळे यांनी केला. याप्रसंगी चेतन चव्हाण, सचिन चव्हाण, रामकृष्ण लोकरे, कपिल पाटील, राहुल पाटील, मोहसीन पोहाळे, जावेद कुरणे, आण्णा शिंदे आदी उपस्थित होते. (छाया-आयुब मुल्ला)