कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज, शनिवारी घेतला. गेल्या दीड महिन्यातील खरेदी दरातील ही दुसऱ्यांदा वाढ केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ साठी ३१ रुपये प्रतिलिटर पैसे मिळणार आहेत.ही अंमलबजावणी २१ ऑगस्टपासून केली जाणार आहे. गेल्या दीड वर्षात ‘गोकुळ’ ने गाय दूध खरेदी दरात चार वेळा वाढ करत प्रतिलिटर ५ रुपये शेतकऱ्यांना जादा दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.विरोधकांच्या रणनितीने गोकुळची सभा वादळी शक्यगोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या सोमवारी (दि. २९) दुपारी १ वाजता महासैनिक दरबार हॉल येथे होणार आहे. या सभेत सत्तारूढ गटाची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी आखल्याने ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून उपस्थित केलेले जाणारे संभाव्य प्रश्न, त्यावर समर्पक उत्तर देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे.सभा पाच तास चालू दे, तुम्ही चालवा‘गोकुळ’च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाची गेल्या दीड वर्षांत संचालक मंडळाने पूर्तता केली आहे. त्यामुळे संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रश्नांची उत्तरे द्या, सभा पाच तास चालू दे, तुम्ही चालवा. अशी सूचना आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी संचालकांना केल्या आहेत.
‘गोकुळ’ने गाय दूध खरेदी दरात केली वाढ, दूध उत्पादकांना होणार फायदा
By राजाराम लोंढे | Published: August 27, 2022 5:45 PM