२) नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरूण डाेंगळे यांनी नेत्यांचा गुलाबाचा हार घालून सत्कार केला. (फोटो-०७०५२०२१-कोल-गोकुळ मिटींग०३)
३) कट्टर विरोधक आले एकत्र......‘गोकुळ’च्या निवडणुकीमुळे अनेक मतदारसंघातील कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर आले. ‘राधानगरी’ मतदारसंघातील विरोधक के. पी. पाटील व प्रकाश आबीटकर शुक्रवारी नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत शेजारी बसले होते, त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. (फोटो-०७०५२०२१-कोल-गोकुळ मिटींग०४) (छाया- आदित्य वेल्हाळ)
४) ही दोस्ती तुटायची नाय.....कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची मैत्री घट्ट आहे. या दोघांनी जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने ताब्यात घेतली आहेत. शुक्रवारी ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी अशी घट्ट मिठी मारत ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हेच त्यांच्या विरोधकांना सांगितले. (फोटो-०७०५२०२१-कोल-गोकुळ मिटींग०१) (छाया- राज मकानदार)