शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

Kolhapur News: अमूल पाठोपाठ ‘गोकुळ’च्या दूध दरातही वाढ; प्रतिलिटरला आता 'इतके' रुपये मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:33 AM

संपूर्ण देशात दुधाची टंचाई भासू लागल्याने गेल्या वर्षभरात दुधाच्या दरात प्रतिलिटर दहा रुपयांची वाढ झाली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) म्हैस व गाय दूध आज, शनिवारपासून प्रतिलिटर दोन रुपयांनी महागले आहे. मुंबई व पुण्यात म्हैस दुधासाठी प्रतिलिटर ७२ तर कोल्हापुरात ६६ रुपये मोजावे लागणार आहेत. गाय दुधाचे दर अनुक्रमे ५६ व ५० रुपये राहणार आहेत. विक्रीबरोबरच खरेदी दरातही वाढ केली जाणार असून दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.संपूर्ण देशात दुधाची टंचाई भासू लागल्याने गेल्या वर्षभरात दुधाच्या दरात प्रतिलिटर दहा रुपयांची वाढ झाली आहे. दुधाची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत वाढत असल्याने सगळीकडेच दुधाची टंचाई भासत आहे. त्यात तोंडावर उन्हाळा सुरू असल्याने उत्पादनात थोडी घट होऊन मागणी वाढणार आहे.दरम्यान, राज्यातील सर्वच दूध संघांनी पाच- सहा दिवसांपूर्वी दुधाच्या खरेदी व विक्री दरात वाढ केली होती. त्यामुळे ‘गोकुळ’च्या पातळीवर दरवाढीबाबत हालचाली सुरू होत्या. त्यानुसार म्हैस व गाय विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली आहे.खरेदी दरात तीन रुपयांची वाढ शक्यविक्री दरात दोन रुपयांची वाढ केल्यानंतर खरेदी दरात तेवढीच वाढ करण्याबाबत ‘गोकुळ’च्या पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, तीन रुपये वाढ करून उत्पादकांना खूश करण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापन करण्याची शक्यता आहे.

असा राहणार विक्रीचा दर, प्रतिलिटर -दूध    -  मुंबई  -  पुणे   -  कोल्हापूरम्हैस      ७२        ७२       ६६गाय       ५६        ५६      ५०

इतर दूध संघांनी विक्री दरात वाढ केल्याने ‘गोकुळ’नेही निर्णय घेतला. खरेदीचा दरही वाढवला जाईल, याबाबत दोन दिवसांत संचालक मंडळात निर्णय घेऊ. - विश्वास पाटील, अध्यक्ष, गोकुळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ