कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचे साहित्य आज, शनिवारी दुपारी तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्रावर पोहोच केले जाणार आहे.गोकुळच्या मतदानाची तयारी पूर्ण आली असून शुक्रवारी केंद्रावर लागणारे साहित्याचे पॅकिंग करून ठेवले आहे. तालुक्यातील ७० केंद्रांवर हे साहित्य आज, दुपारी पोहोच केले जाणार आहे. सकाळी आठपासून मतदान होणार असून साधारणत: एका केंद्रावर ५० मते होणार आहेत.दरम्यान, मंगळवारी (दि. ४) मतमोजणी होत आहे. त्यासाठीच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शुक्रवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे पूर्ण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून मतमोजणी प्रतिनिधींची संख्याही मर्यादित ठेवण्यात आली आहे. एका टेबलवर दोन्ही पॅनलचेच प्रत्येकी दोन असे चार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.एका केंद्रावर चार कर्मचारीकेंद्राची संख्या वाढल्याने मतदानाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एका केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.मतदारांना मास्क, कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड निवडणूक यंत्रणेने प्रत्येक मतदाराला मास्क तर कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड दिले जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रावर सॅनिटायझर, हॅण्डवॉश, मास्क आदीचे किट दिले आहेत.
Gokul Milk Election : गोकुळ मतदानासाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 7:55 PM
Gokul Milk Election :गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचे साहित्य आज, शनिवारी दुपारी तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्रावर पोहोच केले जाणार आहे.
ठळक मुद्दे मतदानाचे साहित्य शनिवारी केंद्रावर रवाना होणार मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण