शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

Gokul Milk Election -गोकुळ साठी रविवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 7:47 PM

Gokul Milk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) , रविवारी मतदान होत आहे. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून ३,६५० मतदार आहेत. येथे सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी व पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये सामना होत आहे.

ठळक मुद्देगोकुळ साठी रविवारी मतदानहसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील, महादेवराव महाडीक यांची प्रतिष्ठा पणास

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) , रविवारी मतदान होत आहे. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून ३,६५० मतदार आहेत. येथे सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी व पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये सामना होत आहे.राज्यातील सर्वात सक्षम असलेल्या गोकुच्या निवडणुकीची गेली दोन महिने रणधुमाळी सुरू आहे. संघावर गेली अनेक वर्षे पी. एन. पाटील व महादेवराव महाडीक यांची सत्ता आहे. मागील निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. गेली पाच वर्षे दूध दरवाढ, पशुखाद्याच्या दरातील वाढ, मल्टीस्टेटच्या मुद्यावरून मंत्री पाटील यांनी सत्तारूढ गटाची कोंडी केली होती. त्यांच्या रेट्यामुळेच मल्टीस्टेटचा निर्णय मागे घ्यावा लागला होता.हाच मुद्दा सध्या प्रचारात असून टँकर वाहतुकीसह आदी मुद्यांवर विरोधकांनी रान उठवले आहे. तर चारशे कोटींच्या ठेवी असणारा ह्यगोकुळह्ण हा राज्यातील एकमेव दूध संघ असल्याचा दावा सत्तारूढ गट करत आहे. त्याचबरोबर ३,१३,२३ तारखेला न चुकता शेतकऱ्यांना पैसे देण्याची परंपरा जोपासल्याचा मुद्दा त्यांनी प्रचारात रेटला आहे.गोकुळच्या कारभारावर टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी त्यापेक्षाही मंत्री सतेज पाटील व महादेवराव महाडीक यांच्यातील जुगलबंदीने या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे.तालुक्याच्या ठिकाणी ७० केंद्रांवर मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेऊन ही प्रक्रिया पार पाडली जाणार असून मंगळवारी (दि. ४) मतमोजणी होणार आहे. संघाचे ३,६५० मतदार असले तरी आतापर्यंत तीन सभासदांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रत्यक्षात ३,६४७ सभासदच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, सहाय्यक म्हणून तहसीलदार शरद पाटील व सहाय्यक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख हे काम पाहत आहेत.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण