शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

‘गोकुळ’, जिल्हा बँकेसाठी जुना पोटनियमच

By admin | Published: November 01, 2014 12:40 AM

क्रियाशील-अक्रियाशीलमधून सभासदांची सुटका : पुढील निवडणुका होणार सुधारित घटनादुरुस्तीनुसार

राजाराम लोंढे - कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसह निवडणुकीस पात्र असणाऱ्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका जुन्या पोटनियमानुसारच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत क्रियाशील व अक्रियाशील सभासदांची छाननी लावली जाणार नाही. या संस्थांच्या पुढील पंचवार्षिक निवडणुका सुधारित घटनादुरुस्तीनुसार होणार आहेत. पात्र संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, कोल्हापुरात येत्या चार-पाच महिन्यांत २,६८९ संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. केंद्र सरकारने सहकारी संस्थांची घटनादुरुस्ती करून संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून येथून पुढे सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कॉँग्रेस आघाडी सरकारने दुष्काळ, लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करीत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या होत्या. विधानसभा निवडणुका संपल्याने पात्र संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात डिसेंबर २०१४ अखेर सुमारे २,६८९ संस्था निवडणुकीस पात्र आहेत. या संस्थांच्या वर्गवारीनुसार प्राधिकरणाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील सुमारे ३७७ संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर इतर संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. प्राधिकरणाने बॅँकेकडे ३१ नोव्हेंबरपर्यंत मतदारांची यादी मागविली आहे; पण सुधारित घटनादुरुस्तीनुसार मतदार यादी तयार केली जाणार का? याविषयी संस्थापातळीवर कमालीची संभ्रमावस्था आहे. सुधारित पोटनियमानुसार यादी बनविली तर अनेक संस्था (पिशवीतील) मतदार यादीतून बाहेर राहणार आहेत. जिल्हा बॅँकेशी संलग्न संस्थांनी नवीन पोटनियमानुसार आपले भागभांडवल वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इतर संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.