कोल्हापूर : ‘गोकुळ’ने २०१८-१९मध्ये गाय दूधपुरवठ्यावर दूधदर फरक न देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची पुढील वर्षाची दिवाळी ‘कडू’ जाणारहे मात्र निश्चित आहे. याचा जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांना तब्बल ३३ कोटी रुपयांचा फटका बसणार असून, या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झालेआहेत.
जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंंदू साखर उद्योग असला तरी या उद्योगातील बेभरवशामुळे शेतकरी अरिष्टात सापडला आहे. चौदा महिन्यांनी ऊस तुटतो आणि त्यानंतर महिना-दोन महिन्यांनी उसाचे पैसे हातात पडतात. विकास संस्था, बॅँकांकडून केलेल्या कर्जाची वसुली होऊन राहिले तर चार पैसे शेतकºयांच्या हातात येतात, अशा परिस्थितीत गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून जिल्ह्यातील सामान्य माणसाला खºया अर्थाने आधार देण्याचे काम दूध व्यवसायाने केले. प्रत्येक महिन्याच्या ८, १८, २८ तारखेला दुधाचे पैसे शेतकºयांच्या हातात पडू लागल्याने त्याचा संसार उभा राहिला. त्याचबरोबर दूधदर फरकामुळे उत्पादकांची दिवाळी गोडधोड होऊ लागली.
गेली अनेक वर्षे ‘गोकुळ’ची ही परंपरा आहे. आर्थिक वर्षात संघास पुरवठा केलेल्या गाय दुधाला प्रतिलिटर एक रुपये ६५ पैसे दूधदर फरक दिला जातो. दरवर्षी यामध्ये वाढच होत गेली; पण अतिरिक्त गाय दुधाचे कारण पुढे करीत खरेदी दरात कपात केली. सरकारच्या अनुदानानंतर दोन रुपये दरवाढ केल्याने हा व्यवसाय कसा तरी सावरतो तोपर्यंत गाय दूध उत्पादकांना २०१८-१९ या कालावधीतील (१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ ) दूध दर फरक न देण्याचा निर्णय ‘गोकुळ’ने घेतला.‘गोकुळ’कडे रोज सरासरी साडेपाच लाख लिटर गायीचे दूध येते. वार्षिक वीस कोटी सात लाख ५० हजार लिटर गायीचे दूध संकलनआहे.
‘दिवाळी’साठी दिलाजाणारा प्रतिलिटर १.६५ रुपयेफरक न दिल्याने उत्पादकांना ३३कोटी १३ लाखांचा फटका बसणार आहे.संस्थाचालक मूग गिळून गप्प का?दूधदरात कपात करून अगोदर गाय दूध उत्पादकाला संघाने मारले. आता एक पैसाही दूध फरक दिला जाणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, असे असताना संस्थाचालक मूग गिळून गप्प का? संचालकांच्या दबावाखाली आम्हाला मारता का? अशी विचारणा शेतकरी करीत आहेत.दोन दिले पावणेदोन काढून घेतले : शासनाकडून पाच रुपये अनुदान घेऊन ‘गोकुळ’ने उत्पादकांना दोन रुपये दिले; पण दूध फरकाच्या माध्यमातून पावणेदोन रुपये काढून घेतले. मात्र, प्रत्यक्षात ३५ पैसेच खरेदी दरात वाढ झाली.
दूध फरकाबाबत घेतलेला निर्णय निश्चितच वेदनादायी आहे. हे संकट येणार हे अडीच वर्षांपूर्वीच माहिती होते. त्यामुळे ‘गठडे’ थोडे सांभाळून ठेवा, असा सल्ला दिला होता. तो ऐकला असता तर ही परिस्थिती आली नसती.- अरुण नरके ज्येष्ठ संचालक, गोकुळ