शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur- गोकुळ सभा: सतेज पाटील प्रश्नांवर अर्धसत्य सांगतात, शौमिक महाडिक यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 1:39 PM

गेल्या आर्थिक वर्षात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

कोल्हापूर : वासाचे दूध परत करणार, असे सतेज पाटील सांगत होते. मात्र, सभेत नेमके किती वासाचे दूध परत केले हे सांगितले नाही. यामुळे सतेज पाटील हे गोकुळवर विचारलेल्या प्रश्नावर अर्धसत्य सांगतात, असा आरोप गोकुळमधील विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी समांतर सभेत केला.गोकुळ दूध विक्रीचा पुण्यातील ठेका पूर्वी महाडिक यांच्या नातेवाईकांकडे होता, असे सांगितले. मग आता सतेज पाटील यांच्या नातेवाईकाकडे आहे का? असेल तर हे सांगण्याचे धारिष्ट्य का दाखविले नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. गेल्या आर्थिक वर्षाच्या कारभारात भ्रष्टाचार झाला आहे. लेखा परीक्षणातही ताशेरे आहेत. याला व्यासपीठावर बसलेल्या संचालकांची मान्यता असेल, माझी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या.महाडिक म्हणाल्या, एखाद्या संस्थेचे सलग आठ दिवस वासाचे दूध काढले तर त्या संस्थेचे नुकसान होते. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना दिशाभूल करणारे उत्तर दिले. गोकुळने १२०० दूध संस्थांना अ वर्ग सभासद करून घेतले आहे. इतक्या संस्था वाढल्या असतील तर दूध संकलनात वाढ का नाही? अशी विचारणा केली होती. मात्र, संस्थांना शासनाने मान्यता दिली आहे, असे चुकीचे उत्तर दिले. पुण्यात गोकुळ दूध विक्रीचा ठेका घेतलेले रणजित धुमाळ कोण? असा प्रश्न विचारला होता. मात्र, शेवटपर्यंत ते कोण आहेत ते सांगितलेले नाही. केवळ पूर्वी महाडिक यांच्या नातेवाईकांकडे ठेका होता. आता नवीन ठेकेदार नेमला आहे.

एकेका संचालकांना १५० पासेस दिलेएकेका संचालकांना १५० प्रवेश पास वितरण करण्यात आले होते. एकाच वेळी मोठ्या संख्येने सभासद आल्यानंतर त्यांना सभेच्या ठिकाणी प्रवेशाची व्यवस्था तोकडी होती. यातूनच सभासदांचा उद्रेक झाला. त्याला जबाबदार कोण? अशीही विचारणा महाडिक यांनी केली.

चार भिंतीत चर्चेची सवय नाही..संचालकांनी सभेत प्रश्न विचारायचे नाहीत, सभासदांनी विचारायचे असतात, असे मला व्यासपीठावरून सांगण्यात आले. पण मला सत्ताधारी संचालकांप्रमाणे चार भिंतीत चर्चा करण्याची सवय नाही. मला निवडून दिलेल्या सभासदांसमोर प्रश्न विचारायचे होते, असा खुलासाही महाडिक यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील