लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने आयोजित केलेल्या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत गडहिंग्लज येथील संजय सिद्धलिंग जरळी यांच्या म्हैशीने, तर माणकापूर (ता. चिकोडी) येथील प्रफुल्ल राजेंद्र माळी यांच्या गायीने प्रथम क्रमांक पटकाविला. म्हैस गटात अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील राजेंद्र अंकलखोपे यांनी दुसरा, तर चिखली (ता. कागल) येथील अमरसिंह पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.गाय गटात आत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील गजानन पाटील यांनी द्वितीय, तर शिरोळ येथील सचिन कागवाडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला असून, विजेत्यांचा सत्कार संघाच्या १५ सप्टेंबरला होणाºया सर्वसाधारण सभेत गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकातून दिली.
‘गोकुळ’च्यावतीने गेली २६ वर्षे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. दूध उत्पादनात वाढ करणे, जातिवंत जनावरांचे संगोपन व त्यांची दुधाची क्षमता वाढविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. जातिवंत जनावरांची पैदास व्हावी व त्यातून दूध उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी संघाने वासरू संगोपन योजना सुरू केली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जुलै २०१७ अखेर ६६ हजार जनावरे दुधात आलेली असून, यासाठी संघाने२९ कोटींचे अनुदान उत्पादक शेतकºयांना दिले आहे. या योजनेमुळे प्रतिदिनी तीन लाख लिटरने संकलनात वाढ झाल्याचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.लाखांच्या बक्षिसांचे वाटप : स्पर्धेतील म्हैस गटातील तीन व गाय गटातील तीन अशा सहा विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला जातो. सहा विजेत्यांना एक लाख पाच हजारांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.‘गोकुळ श्री’ स्पर्धेतील विजेतेउत्पादकाचे नाव गाव दिवसाचे दूध क्रमांक बक्षीस रुपयांतसंजय जरळी गडहिंग्लज १७.५५० लिटर प्रथम २५ हजारराजेंद अंकलखोप अर्जुनवाडा १५.६१० लिटर द्वितीय २० हजारअमरसिंह पाटील चिखली १५.३४० लिटर तृतीय १५ हजारप्रफुल्ल माळी माणकापूर ३४.१७५ लिटर प्रथम २० हजारगजानन पाटील आत्याळ २९.८६० लिटर द्वितीय १५ हजारसचिन कागवाडे शिरोळ २८.०९५ लिटर तृतीय १० हजार