कोल्हापूर : रस्त्यावर दिवसरात्र राबवणाऱ्या पोलीस, महापालिका कर्मचारी या कोविड योद्धांसाठी गुरुवारी गोकुळच्या ताराबाई पार्कातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने ताक वाटप करत आपुलकीचा हात दिला.
गोकुळ दूध संघाचे कर्मचारी देखील कोविड योद्धे आहेत. गेले दीड वर्ष अविरतपणे दूध उत्पादकांकडून दूध घेऊन ते मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठेमध्ये विनाव्यत्यय पोहोच करत आहेत, पण या कर्मचाऱ्यांनी आपल्याल्या होणाऱ्या कष्टाची जाणीव ठेवत रस्त्यावर अहोरात्र राबत असलेल्या पोलीस व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पोटात घास घातला.
अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व नियोजन झाले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ. यु. व्ही. मोगले, संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, डॉ. प्रकाश साळुंखे, अशोक पुणेकरल ताराबाई पार्क कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो: २००५२०२१-काेल-गोकुळ
फोटो ओळ: गोकुळ दूध संघातील कर्मचाऱ्यांनी कोविड योद्धयांना ताक वाटप करत त्यांच्या कार्याला सलाम केला.