शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

गोकुळचा मुंबईचा दूध पुरवठा सुरळित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 2:37 PM

महापुराने कोल्हापूरला वेढा दिल्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सोमवारच्या संकलनावर मोठा परिणाम झाला. परंतू मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देगोकुळचा मुंबईचा दूध पुरवठा सुरळितसंघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांची ‘लोकमत’ला माहिती

कोल्हापूर : महापुराने कोल्हापूरला वेढा दिल्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सोमवारच्या संकलनावर मोठा परिणाम झाला. परंतू मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी ‘लोकमत’ला दिली.गोकुळ संघ मुंबईला प्रतिदिन सुमारे ८० हून जास्त टँकरद्वारे ६.५० लाख लिटर दूधाचा पुरवठा करतो. पुण्यातही २ लाख लिटर दूध पुरविले जाते. पावसामुळे सोमवारी सकाळी ९० हजारांहून अधिक लिटर दूध संकलन झाले नाही. सायंकाळी सुमारे ७० हजार लिटर दूध संकलन होण्याची शक्यता नाही. परंतू तरीही मुंबई व पुणे बाजारपेठेतील दूध पुरवण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

पुराच्या पाण्याचा फटका ‘गोकुळ’च्या दूध संकलनावर झाला आहे. गगनबावडा, बाजार भोगाव परिसरात पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प झाल्याने संघापर्यंत दूध पोहोचू शकलेले नाही.जिल्ह्यात गेले तीन-चार दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. ९८ बंधारे पाण्याखाली गेले आहेतच, त्याशिवाय अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.  राधानगरी, कडवी, कासारी, वारणा धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी वाढत आहे.पुराच्या पाण्याचा फटका सर्वच घटकांना बसत असून, ‘गोकुळ’च्या दूध संकलनावरही त्याचा परिणाम झाला आहे. गगनबावडा, धामणी खोरा व बाजार भोगाव परिसरातून होणारी दुधाची वाहतूक ठप्प झाली आहे. बाजारभोगावजवळ कासारी नदीच्या पुराचे पाणी आल्याने त्यापुढील सर्व मार्ग बंद झाले आहेत. तर लोंघे येथे पाणी आल्याने गगनबावड्यासह तळकोकणाचा संपर्क तुटला आहे.

गगनबावड्यात बल्ककुलर असला, तरी तिथे तीन वेळचे संकलनच होऊ शकते; त्यामुळे दूध संकलन ठप्प झाले आहे. बुधवारी ‘गोकुळ’चे संकलन कमी झाल्याची माहिती संघ प्रशासनाने दिली.

 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई