कोल्हापूर : नेर्ली (ता. करवीर) येथे गोकुळ दूध संघाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ शॉपीचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, करवीरच्या सभापती मंगल पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, गोकुळचे मार्केटिंग विभागाचे हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, अशोक गुरव, शंकर पाटील, भाऊसाहेब चौगुले, के. टी. मगदुम, अजिक्य पाटील, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, गोकुळच्या उच्च दर्जाच्या उत्पादनामुळे ग्राहकांचे निश्चितच समाधान होईल. या शॉपीमध्ये दूध, तूप, पनीर, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, बासुंदी सर्व पदार्थ या परिसरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
फोटो ओळी : नेर्ली (ता. करवीर) येथील ‘गोकुळ’च्या शॉपीचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अरुण डोंगळे, करवीरच्या सभापती मंगल पाटील, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, डी. व्ही. घाणेकर, हणमंत पाटील आदी उपस्थित होते. (फाेटो-०७०९२०२१-कोल-गोकुळ)