कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) ‘अमूल’ दूध संघाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या मेहसाना जिल्ह्यात (गुजरात) एंट्री केली आहे. या मेहसाना दूध संघाच्या माध्यमातून रोज २५ हजार लिटर म्हशीच्या दुधाची खरेदी सुरू आहे. मुंबई येथील प्रकल्पावर प्रक्रिया करून तिथेच दुधाची विक्री केली जात आहे. ‘अमूल’च्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवेशाला ‘गोकुळ’ने त्याच ताकदीने प्रत्युत्तर दिल्याने दुधातील या दोन ‘हिंदकेसरी’तील स्पर्धा चांगलीच गाजणार हे निश्चित आहे. गुजरातच्या ‘अमूल’च्या ब्रँडची देशपातळीवर कमालीचा दबदबा आहे; पण गेले दीड-दोन वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रात संकलनास सुरुवात केली आहे. ‘अमूल’ने आता पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळविला आहे. येत्या वर्ष-दीड वर्षांत संकलन सुरू करण्याची रणनीती त्यांची आहे. त्यामुळे ‘गोकुळ’सारख्या प्रस्थापितांना त्रास होणार हे निश्चित आहे; पण ‘अमूल’च्या या आव्हानाला त्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्याची तयारी ‘गोकुळ’ने केली आहे. असून त्याचा पहिला घाव ‘अमूल’च्या बालेकिल्ल्यातच घातला आहे. गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील दूध संघाशी जवळीक वाढवत तिथे संकलन सुरू केले आहे. रोज २५ हजार लिटर दूध संकलित करून त्याची ६०० ते ७०० किलोमीटर वाहतूक करून मुंबई येथे आणले जाते. येथील प्रकल्पावर प्रक्रिया करून पॅकिंग केले जाते. अमूल’च्या अडचणी ‘गोकुळ’च्या दूध दराबरोबरच इतर सोयी-सुविधा शेतकऱ्यांना दिल्या जातात. ‘अमूल’ इतर सुविधा देत नसल्याने जर ‘गोकुळ’ गुजरातमध्ये ताकदीने उतरले तर थेट शेतकरी व दूध संघ दूध पुरवठा करण्यास तयार होऊ शकतात.
‘अमूल’च्या कार्यक्षेत्रात ‘गोकुळ’ची जोरदार एंट्री
By admin | Published: April 17, 2017 1:00 AM