कोल्हापूर: तिलारी दोडामार्गमार्गे गोव्याकडे जाणारी सर्व वाहतूक चंदगड जवळ तिलारी घाटातील रस्ता खोदलेल्या चरीमुळे व अतिवृष्टीमुळे वाहून गेला. यामुळे सर्व वाहतूक ही इसापूर चौकुर मार्गे सावंतवाडीकडे वळविण्यात आली आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि एका खासगी कंपनीने केबल टाकण्यासाठी काढलेली चर यामुळेच हा रस्ता खचल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. मांजरेकर यांनी सांगितले. सुमारे ३० फूट लांब व २ मीटर रुंदीचा हा रस्ता वाहून गेल्याने पहाटेपासून येणारी सर्व वाहतूक ही तत्काळ थांबवून ती पुन्हा मागे वळवून सावंतवाडीमार्गे गोव्याकडे रवाना करण्यात आली. सुदैवाने ही घटना रात्री वाहतुकीची वर्दळ कमी असल्याने झाल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
तिलारी घाटात रस्ता गेला वाहून ; गोव्याकडे जाणारी वाहतूक वळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 5:52 PM
तिलारी दोडामार्गमार्गे गोव्याकडे जाणारी सर्व वाहतूक चंदगड जवळ तिलारी घाटातील रस्ता खोदलेल्या चरीमुळे व अतिवृष्टीमुळे वाहून गेला
ठळक मुद्देरात्री वाहतुकीची वर्दळ कमी असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.