शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

मनपा शाळांना ‘अच्छे दिन’

By admin | Published: March 30, 2017 1:17 AM

पहिलीला हाऊसफुल्ल प्रवेश : पालकांचा विश्वास वाढला

यशवंत गव्हाणे-- कोल्हापूर --महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कायम नाक मुरडणारे पालक आज कोल्हापूर शहरातील मनपा शाळेत आपल्या पाल्यास पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून रांगेत उभे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शाळांच्या गुणवत्तेमुळे शहरातील सर्व मनपा शाळा मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हाऊसफुल्ल झाल्या. महापालिकेची शाळा म्हटली की नको रे बाबा... अशीच काही मानसिकता काही वर्षांपूर्वी पालकांची झाली होती. त्यामुळे या शाळांना उतरती कळा लागली होती. शाळेतील पटसंख्या पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना पालकांच्या दारोदारी फिरावे लागत असे. तरी पालक पाल्यांना या शाळेत घालण्यास तयार होत नव्हते. परंतु, मनपा शाळेतील अनेक प्रशासनाने यात आमूलाग्र बदल करीत शिक्षणाचा दर्जा उंचावला. त्यातच ई-लर्निंगस, शाळाअंतर्गत फिल्म फेस्टिव्हलसारखे उपक्रम राबवून नव्या तंत्रज्ञानाची कास धरली आणि वेळोवेळी बदल करीत आज या शाळा आपले अस्तित्व टिकवून ठेवत आहेत. ही बाब खरंच कौतुकास्पद आहे.शहरात सध्या महापालिकेच्या ५९ शाळा आहेत. यामध्ये जवळपास ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील ४२ शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत, तर १८ शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण दिले जाते, तर ३६० शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यापैकी नेहरूनगर, टेंबलाईवाडी, फुलेवाडी, जरगनगर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, उर्दू मराठी शाळा, साने गुरुजी वसाहत, हिंद विद्यामंदिर येथील शाळांमध्ये प्रवेशासाठी अक्षरश: झुंबड उडत आहे. (पान ३ वर)शाळांची प्रवेशाची आकडेवारी शाळा पट प्रवेश नेहरूनगर विद्यामंदिर८०६०जरगनगर१८६१७५महात्मा फुले, फुलेवाडी६४६०कर्मवीर भाऊराव पाटील३१३०प्रिन्स शिवाजी जाधववाडी६१६०टेंबलाईवाडी विद्यामंदिर६३६०जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शाळासिद्धीसारखे उपक्रम राबविले जातात. यातून भौतिक सुविधा पुरविण्यासोबतच गुणवत्तेबाबतही विशेष लक्ष दिले गेले. - प्रतिभा सुर्वे, प्रभारी प्रशासनाधिकारी, प्रा. शि. स.पट वाढीमागची कारणे कृतियुक्त अध्यापन पद्धती व तंत्रज्ञानामुळे अध्यापनात आलेली रंजकता प्रशासनाने पूर्णवेळ दिलेले शैक्षणिक पर्यवेक्षक, गुणवत्तेत वाढ प्रशासनाधिकारी व पदाधिकारी यांचे शिक्षकांना मिळणारे प्रोत्साहनयंदा प्रथमच शहरस्तरीय मध्यवर्ती क्रीडास्पर्धांचे आयोजनशिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना तब्बल २४०० रुपयांची शिष्यवृत्ती शिक्षक, पत्रकार, पोलिस, इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे प्राधान्यसमविचारी शिक्षकांची व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमांतून होणारी ज्ञानाची देवाण-घेवाण