शिरोळ : सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी ओळखून स्व. सा. रे. पाटील यांनी अडतीस वर्षांपूर्वी ग्राहक संस्था उभी केली. व्यापारातील बदलानुसार दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेऊन आधुनिक बझार केंद्र सुरू करून ग्राहकांच्या सेवेसाठी मॉल उभारला, ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी केले.
शिरोळ येथे श्री दत्त सहकारी ग्राहक सेवा संस्थेच्या नूतनीकरणाचे उद्घाटन सहाय्यक निबंधक मालगावे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपस्थित होते.
गणपतराव पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात जागतिक मंदी असतानाही सुनियोजन पद्धतीने ग्राहक बझार सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने देत आहोत. कठीण परिस्थितीत स्वनिधीतून सभासदांना लाभांशदेखील दिला आहे. संस्थेचे आधुनिकीकरण निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस पडणार आहे.
प्रारंभी स्वागत व्यवस्थापक पी. व्ही. कुलकर्णी तर संस्थेचे अध्यक्ष दामोदर सुतार यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी डॉ. अमोल आचरेकर, विनया घोरपडे, अशोक कोळेकर, दरगू गावडे, मुसा डांगे, अजय भोगले, अजय दुर्वास, महेंद्र बागी, सुहास मडिवाळ उपस्थित होते. एस. ए. घोरपडे यांनी आभार मानले.
फोटो - २९०६२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथे श्री दत्त ग्राहक संस्थेच्या नूतनीकरणाचे उद्घाटन सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या हस्ते झाले. या वेळी गणपतराव पाटील, दामोदर सुतार, प्रेमदास राठोड उपस्थित होते.