कोल्हापूर : उद्योजक सभासद यांनी दाखविलेला विश्वास आणि संचालक, कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची चांगली कामगिरी झाली आहे. सभासदांना अधिकाधिक सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही या सोसायटीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत जाधव यांनी रविवारी दिली.
येथील वाय. पी. पोवारनगरमधील उद्यम सांस्कृतिक सभागृहात सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली. त्यामध्ये अध्यक्षस्थानावरून आमदार जाधव बोलत होते. प्रभारी सचिव प्रभाकर पाटील यांनी अहवाल वाचन केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत चोरगे, संचालक हिंदुराव कामते, संजय अंगडी, अशोक जाधव, माणिक सातवेकर, संगीता नलवडे, दीप्तेजा निकम, राजन सातपुते, आदी उपस्थित होते. संचालक दिनेश बुधले यांनी आभार मानले.
फोटो (२२०३२०२१-कोल-उद्यम सोसायटी) : कोल्हापुरात रविवारी उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ऑनलाईन वार्षिक सभेत अध्यक्ष आमदार चंद्रकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी दिनेश बुधले, चंद्रकांत चोरगे, हिंदुराव कमते, आदी उपस्थित होते.