शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘बंद’ला चांगला प्रतिसाद....

By admin | Published: July 29, 2016 1:02 AM

हद्दवाढीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर : दगडफेक, तोडफोड, धक्काबुक्कीच्या घटना; जनजीवन विस्कळीत

कोल्हापूर : ‘कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे,’ या मागणीसाठी हद्दवाढ समर्थक कृती समितीने पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान चार रिक्षा फोडण्यात आल्या. एका एस.टी.ची तोडफोड झाली. राजारामपुरीत दुकानाची काच जमावाने फोडली. कार्यकर्त्याला धरून नेणाऱ्या पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या अंगावर जमाव धावून गेल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. हद्दवाढ न झाल्यास महापालिकेच्या नगरसेवकांनी राजीनामा द्यावेत, असे आवाहन माजी महापौर आर. के. पोवार यांनी केले. हद्दवाढीस विरोध करणाऱ्या तिघा आमदारांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. त्यांच्या नावाने महापौर अश्विनी रामाणे यांनीही शिवाजी चौकात शंखध्वनी केला. दरम्यान, बंदी आदेशाचा भंग करीत रॅली काढल्याप्रकरणी महापौरांसह शंभर जणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. कोल्हापूरची अठरा गावांसह हद्दवाढ प्रस्तावित आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या अधिसूचनेवरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली; परंतु त्यांच्याच पक्षाचे आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व डॉ. सुजित मिणचेकर यांनी हद्दवाढीस कडाडून विरोध केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीची अधिसूचना बुधवारी स्थगित केली. हद्दवाढीस विरोध म्हणून अठरा गावांनीही बंद पाळून सरकारला इशारा दिला आहे. या सगळ््याचा परिणाम म्हणून हद्दवाढीच्या समर्थनार्थ महापौर अश्विनी रामाणे यांनीच ‘बंद’चे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून महापालिकेचे सर्व कर्मचारी ‘काम बंद’ ठेवून बंदमध्ये सहभागी झाले. नागरी वाहतुकीची महत्त्वाची व्यवस्था असलेल्या के.एम.टी.ची एकही गाडी रस्त्यावर आली नाही. या यंत्रणेचे कर्मचारीही गाड्या कार्यशाळेत लावून मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांचे काही प्रमाणात हाल झाले. रिक्षा वाहतूक मात्र काही प्रमाणात सुरू राहिली. चित्रपटाचा पहिला शो काही ठिकाणी सुरू राहिला. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी ‘बंद’मध्ये भाग घेतल्याने शाळांतील उपस्थिती रोडावली. कॉलेज सुरू झाली होती; परंतु बंद समर्थक कार्यकर्त्यांनी तिथे जावून कॉलेज बंद करायला भाग पाडले. नेहमी गजबजलेला महाद्वार रोड, शिवाजी चौकचा परिसर, गुजरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या व्यापारी पेठांतील व्यवहारही दुपारपर्यंत बंदच राहिले. रस्त्यावरील वर्दळही कमी होती.सकाळी शिवाजी चौकातून महापौर रामाणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ‘बंद’चे आवाहन करत फेरी काढली. ‘झालीच पाहिजे, झालीच पाहिजे हद्दवाढ झालीच पाहिजे’ या घोषणेने परिसर दणाणून सोडला. त्यामध्ये माजी महापौर आर. के. पोवार, उपमहापौर शमा मुल्ला, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, परिवहन समितीचे सभापती लाला भोसले, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम,भाजपचे नेते महेश जाधव, संदीप देसाई, अशोक देसाई, सुरेश जरग, शिवसेनेचे जयवंत हारूगले, शिवसेना गटनेते नियाज खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, भाकपचे नामदेव गावडे, तसेच समीर नदाफ, ईश्वर तिवारी, मनसेचे विजय करजगार, दिलीप देसाई, दुर्वास कदम, सतीशचंद्र कांबळे, नगरसेवक शेखर कुसाळे, किरण नकाते, राजाराम गायकवाड, अजिंक्य चव्हाण, दिलीप पवार, राहुल माने, माधुरी लाड, सूरमंजिरी लाटकर, आदिल फरास, अनिल कदम, पद्माकर कापसे, लाला गायकवाड, धनाजी दळवी, किशोर घाटगे, प्रसाद जाधव, प्रकाश सरनाईक आदी सहभागी झाले. ही फेरी राजारामपुरीत आली असता बेकरी बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यास पोलिसांनी पकडले. त्याला सोडण्यात यावे, असा तगादा कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याकडे धरला. त्यावरून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.आजी-माजी आमदारांचा निषेधहद्दवाढीस विरोध केल्याबद्दल आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके व डॉ. सुजित मिणचेकर यांचा कृती समितीने तीव्र शब्दांत निषेध केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांचाही हद्दवाढीस विरोध आहे. त्यामुळे त्यांचाही निषेध करण्यात आला. ‘बंद’मध्ये आमदार सतेज पाटील यांचे मोजके कार्यकर्ते सहभागी झाले. हद्दवाढीच्या मुद्द्यांवर सर्वच पक्षांत शहरी व ग्रामीण अशी फूट पडल्याचे चित्र तयार झाले आहे.हद्दवाढीच्या समर्थनातीलबंद अयशस्वीशहराची हद्दवाढ करावी या मागणीसाठी गुरुवारी शहरात पुकारण्यात आलेला बंद अयशस्वी ठरल्याचा दावा, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर व भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. महापौर, नगरसेवक व काही पक्षांचे निवडक पदाधिकारी वगळता ‘बंद’मध्ये कोणीही सहभाग घेतला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.-वृत्त/८