शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वस्तूंना चांगला प्रतिसाद, जिल्हा परिषदेत प्रदर्शन व विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 6:39 PM

diyang, zp, kolhapur, school, diwali कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर सोमवारी वेगळीच लगबग सुरू होती. दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्री सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि आलेल्या नागरिकांनी वस्तूंची खरेदी करत या विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला दाद दिली.

ठळक मुद्देदिव्यांग विद्यार्थ्यांच्या वस्तूंना चांगला प्रतिसादजिल्हा परिषदेत प्रदर्शन व विक्री

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर सोमवारी वेगळीच लगबग सुरू होती. दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्री सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि आलेल्या नागरिकांनी वस्तूंची खरेदी करत या विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला दाद दिली.या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पणत्या, मेणबत्या, आकाश कंदील, भेटवस्तू तयार केल्या आहेत. या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे. उद्घाटनावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सदानंद बगाडे, सुहास कुरूकले, मुख्याध्यापक कृष्णात चौगुले, उज्ज्वला खेबुडकर, स्मिता रणदिवे, चंद्रकांत शेटे, प्रमोद भिसे, तृप्ती गायकवाड, ईश्वरी शेडबाळे आदी उपस्थित होते.या प्रदर्शनात स्वयंम उद्योग केंद्र, सन्मती मतिमंद विकास केंद्र व व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र, चेतना व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र, बौद्धिक अक्षम मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, कागल, बौद्धिक अक्षम मुलांची शाळा व कार्यशाळा जिज्ञासा राही, कर्णबधिर विद्यालय पेठवडगाव, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल तिळवणी यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. 

टॅग्स :DivaliदिवाळीDivyangदिव्यांगzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर