गडहिंग्लज :
कोरोना काळातील महावितरण कंपनीच्या वीज बिल वसुली मोहिमेला गडहिंग्लज तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष मोहिमेत दोन दिवसांत ५७ ग्राहकांनी ८५ हजारांची थकबाकी भरली.
एप्रिल ते नोंव्हेंबरअखेरची तालुक्याची एकूण थकबाकी पाच कोटी ८८ लाख आहे. त्यासाठी प्रभारी कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली गाववार शिबिरे घेतली जात आहेत.
शुक्रवारी (दि. ४) हसूरचंपू येथील शिबिरास उपस्थित ५६ ग्राहकांपैकी ४३ ग्राहकांनी ४५ हजारांची थकबाकी भरली. यावेळी शिवप्रसाद तेली, तानाजी शेंडगे उपस्थित होते.
शनिवारी (दि. ५) अत्याळ येथील शिबिरास उपस्थित ४५ ग्राहकांपैकी १४ ग्राहकांनी ४० हजारांची थकबाकी भरली. ही बिले जागेवरच भरून घेण्यात आली. थकीत बिलांची ३२ टक्के रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना उर्वरित बिलाचे तीन हप्ते पाडून देण्यात आले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता सागर दांगट, शाखा अभियंता राजेंद्र खांडेकर व राजेंद्र भोपळे यांनी वीज ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले.
------------------------
हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथे महावितरणतर्फे थकीत वीज बिल वसुली शिबिर झाले. यावेळी उपकार्यकारी अभियंता सागर दांगट. शाखा अभियंता राजेंद्र खांडेकर यांनी ग्राहकांच्या शंकांचे समाधान केले.
क्रमांक : ०६१२२०२०-गड-०३