शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘गोकुळ’ला दृष्ट लागू देऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:39 PM

दादांच्या नाराजीनंतर ‘गोकुळ श्री’चे बक्षीस १ लाख

कोल्हापूर : दूध नाशवंत असले तरी हा व्यवसाय नीट केला तर तो अधिक निर्मळ आहे. पण, गैरव्यवस्थापनामुळे महाराष्ट्रातील दूध संघांची वाट लागली असून महाराष्ट्रालाच नव्हे देशाला भूषणावह असे काम करणाऱ्या ‘गोकुळ’ला कोणाची दृष्ट लागू देऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.‘गोकुळ’ दूध संघाच्या हीरक महोत्सव वर्ष समारंभानिमित्त सोमवारी संस्थांना भेटवस्तू वाटप, अद्ययावत लोणी-पेढा प्रकल्प व पेट्रोल पंपाचे भूमिपूजन, ‘गोकुळ श्री’ पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, संस्था नीटपणे चालवल्या नाही तर त्याची जबर किंमत जिल्ह्याला मोजावी लागते. काहींनी जिल्हा बँका चुकीच्या पद्धतीने चालवल्या, त्यांना तुरुंगात जावे लागले. आजही, जिल्हा बँका सरकारच्या हमीशिवाय चालत नाहीत. हे जरी खरे असले तरी ‘कोल्हापूर’, ‘पुणे’ व ‘सातारा’ या जिल्हा बँकांचा कारभार आदर्शवत आहे. ‘गोकुळ’ने धवलक्रांती केली आहे. ‘गोकुळ श्री’ विजेत्यांना कमी बक्षीस देता, तुमच्या खिशातून देता का? माझ्याकडे काम घेऊन येताय, पाच पैसेही न घेता तुमची कामे करतो. मग, तीन क्रमांकासाठी १ लाख , ७५ हजार, ५१ हजार असे बक्षीस यावर्षीपासून करण्याची सूचना अजित पवार यांनी केली.पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरची माती व पाणीच कसदार असल्याने दुधाला वेगळीच चव आहे. ‘अमूल’ने अनेक प्रयत्न केले, पण त्यांना येथे यश मिळाले नाही.

‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, ज्यांची गाय-म्हैस नाही अशांची तक्रार ऐकून कारवाई करत आहे. वजन काट्यासह दूध अनुदानातील त्रुटी दूर करा. आमदार राजेश पाटील, के.पी. पाटील, संजय घाटगे, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने आदी उपस्थित होते. अजित नरके यांनी आभार मानले.

‘गोकुळ’मध्ये पहिल्यांदाच आलो

महाविद्यालयीन शिक्षण येथे झाल्याने कोल्हापूरशी माझे नाते वेगळे आहे, अनेक वेळा कोल्हापुरात आलो, पण ‘गोकुळ’मध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आला. राजकीय जीवनात काम करताना मतभेद असतात, परंतु मनात काही ठेवून काम करायचे नाही. सहकारी संस्थांत राजकारण आणून चालत नसल्याचे पवार यांनी सांगितले.दादा, आमदारकी नको, पण ‘गोकुळ’ द्यामाझ्याकडे कोल्हापुरातील भेटण्यासाठी आलेले, ‘दादा, आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक पद द्या’, अशी विनंती करतात. याची कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ‘गोकुळ’च्या नोकरीसाठी माझ्याकडे चिठ्ठी मागायला येणाऱ्यांची संख्या कमी नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

दूध अनुदानातील त्रुटींबाबत आज बैठक

दूध अनुदानाच्या निर्णयात काही त्रुटी आहेत. आज, मंगळवारी दुग्ध सचिवांसोबत बैठक लावून त्यातूनही माझ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका घेतली जाईल, असे पवार यांनी सांगितले.

अध्यक्षपदासाठी दादांचा शब्द महत्त्वाचा ठरला‘गोकुळ’चे दोन वर्षांसाठी अध्यक्ष करण्याचा शब्द नेत्यांनी दिला होता. पण, यामध्ये अजितदादांचा शब्द महत्त्वाचा ठरल्याचे जाहीर वक्तव्य अरुण डोंगळे यांनी केले.

सतेज पाटील यांच्या अनुपस्थितीची चर्चा

या समारंभाला आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, विनय काेरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबीटकर यांच्यासह खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना निमंत्रित केले होते. पण, यापैकी एकही नेता उपस्थित नव्हता, तर शिवसेनेचे (उबाठा) माजी आमदार संजय घाटगे यांची उपस्थिती मात्र चर्चेची ठरली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळAjit Pawarअजित पवार