कसबा बावडा : रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या नवीन नियमानुसार अनेक बँकांनी आजपासून जुनी एटीएम कार्ड ब्लॉक केली आहेत. त्याचा फटका आज कोल्हापुरातील काही ग्राहकांना बसला. तशा तक्रारीही बँकांकडे आल्या. तक्रार करणाऱ्या ग्राहकांना बँकांनी नवीन एटीएम दिली.
मॅग्नेटिक चीप असलेल्या एटीएम, डेबिट कार्डमधून होणारे फसवणुकीचे प्रकार थांबविण्यासाठी १ जानेवारीपासून जुनी एटीएम कार्ड बंद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेने दोन वषार्पूर्वी घेतला होता. जुन्या एटीएम कार्डच्या बदल्यात नवीन 'ईएमव्ही चिप' असलेली कार्ड ग्राहकांना वितरीत करा, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने बँकांना दिल्या होत्या. तसेच दर तीन महिन्याला त्याचा आढावा घेतला जात होता. रिझर्व बँकेच्या या सूचनांचे पालन बँकांनी करून ग्राहकांना काही महिन्यांपासूनच नवीन सुधारित असलेली एटीएम कार्ड देण्यास सुरुवात केली होती. नवीन कार्डसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.
कोल्हापुरात सध्या एटीएम कार्ड वापरणाया ९० टक्के बँक ग्राहकांकडे ईएमव्ही चिप असलेली कार्ड आहेत. त्यामुळे केवळ दहा टक्के ग्राहकांना मॅग्नेटिक चीप असलेले एटीएम कार्ड बदलून घ्यावे लागणार आहे. जुने कार्ड असलेल्या काही ग्राहकांनी आज एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पैसे मिळाले नाहीत. यातील ज्या ग्राहकांनी बँकेकडे तक्रार केली त्यानां तात्काळ नवीन एटीएम कार्ड देण्यात आले आहे. तर काही बँकांच्या एटीएमवर जुनी एटीएम कार्ड चालू होती. मात्र तीही येत्या दोन-चार दिवसात ब्लॉक होण्याची शक्यता असल्याचे एका बँक अधिकायाने सांगितले.ईएमव्ही चिपबाबतही तक्रारीईएमव्ही चिप असलेले एटीएम कार्ड काही फार जुन्या एटीएम मध्ये चालत नसल्याच्या तक्रारीही आहेत. याबाबत अशा जुन्या एटीएमच्या सॉफ्टवेअर मध्ये येत्या आठवडाभरात त्या त्या बँका बदल करतील अशी माहिती बँक सूत्रांनी दिली.