शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शाबास; साताऱ्यानं गड राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2017 11:41 PM

पवारांकडून कौतुक : भाजपच्या झंझावातातही सत्ता मिळविल्याबद्दल नेत्यांना शाबासकी

महेश आठल्ये -- म्हासुर्ली --आजच्या विज्ञान युगातही धामणी खोऱ्यातील मानबेट आणि चौके (ता. राधानगरी) या गावातील लोक पूर्वपरंपरेने चालत आलेली ‘गावपळण’ प्रथा मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे आजही पाळत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील रेषा यामुळे अंधूक बनली आहे. देवीच्या आदेशाने गावातील सर्व लोक, गुरे-ढोरे, कुत्री-मांजरी, कोंबड्या, पोराटारांसह तीन दिवस जंगलात झोपड्या बांधून राहत असून ही दोन्ही गावे ओस पडली आहेत. एकप्रकारे निसर्गाशी एकरूप होण्याचाच हा प्रकार आहे. चौके आणि मानबेट ही दोन गावे म्हणजे धामणी खोऱ्याचे शेवटचे टोक. या दोन गावांमध्ये शेकडो वर्षांपासून दर तीन वर्षांनी इथले ग्रामस्थ गुरा-ढोरांसह आपला गाव सोडतात आणि तीन दिवस वेशीबाहेर जाऊन जंगलात नदीकाठी झोपड्या बांधून मुक्काम करतात. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली येथील प्रथा ग्रामस्थ मनोभावे पाळतात. मानबेट गावातील ग्रामदैवत रासाईदेवीचा दर तीन वर्षांनी आदेश येतो, असे मानले जाते. या तीन दिवसांत गावात पै-पाहुणाही फिरकत नाही. या तीन दिवसांत गावातील सर्व व्यवहार ठप्प तर होतातच शिवाय गावात चोरीही होत नाही. ही प्रथा न पाळणाऱ्यास, चोरी करणाऱ्यास देवी शिक्षा करते, असा ग्रामस्थांचा समज असून आजपर्यंत चोरीची एकही अशी घटना घडलेली नाही. या ‘गावपाळण’च्या तीन दिवसांत जंगलात एक नवा गावच तयार होतो. प्रत्येकजण आपणास हवी तशी झोपडी बांधतो. सर्वांचा मुक्काम या झोपड्यातच असतो. या काळात गावाकडे फिरकायचेच नाही, असा दंडक आहे. देवीच गावाची रक्षणकर्ती आहे, असा समज आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळासह वृद्ध व अंथरूणास खिळलेल्यांनाही यातून सूट नाही. जात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव यावेळी पाळला जात नाही. विज्ञान युगातही आव्हान ठरणारी ही प्रथा केव्हा सुरू झाली ते मात्र कोणासही सांगता येत नाही. पूर्वज पाळत होते म्हणून आम्ही पाळतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, दर तीन वर्षांनी सर्व गावाला निसर्गाच्या सान्निध्यात एकत्र आणत एकोप्याची भावना वाढविणे, घरांची साफसफाई करणे, निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे आदी उद्देश यामागे असू शकतात. शिवाय पूर्वीच्या काळी गावामध्ये येणाऱ्या देवी, प्लेग सारख्या साथी व त्यापासून बचाव करण्यासाठी गावपळणची प्रथा पडली असण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या युगात याची तुलना अंधश्रद्धेशीच केली जाते. या काळात नोकरी व कामधंद्यासाठी बाहेरगावी असणारे गावकरी गावाकडे येतात व निसर्गाच्या सान्निध्यात जुन्या आठवणींना उजाळा देतात. पुन्हा देवीच्या आदेशानेच घराकडे जायचे असल्याने देवीच्या कौलाकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. बाहेरील पै- पाहुणेही याचा आनंद घेण्यासाठी या नव्या गावात येत आहेत. या दोन गावांना लाभलेली ही परंपरा अंधश्रद्धेच्या भावनेने पाहू नये, अशी येथील लोकांची अपेक्षा आहे. गावे पडली ओस : गुराढोरांसह आबालवृद्धांची गावाबाहेर नवी वस्तीशाळाही भरते झाडाखाली‘गावपळण’च्या काळात गावात एकही सरकारी अधिकारी येत नाही वा त्यास येण्यास मज्जाव केला जातो. येथील शाळाही जंगलातील नवीन गावातील झाडाखाली भरवली जाते व ज्ञानार्जन केले जाते. आता गावपळणीतही शिरले राजकारण‘गावपळण’ची प्रथाही राजकारणास अपवाद ठरली नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा काहीसा परिणाम यावर झाला असून चौके येथील ग्रामस्थांनी दोन ठिकाणी लांब अंतरावर झोपड्या उभारून गटबाजी दाखविल्याची चर्चा आहे.मुक्काम झोपड्यांतचतीन दिवसांत जंगलात एक नवा गावच तयार होतो. सर्वांचा मुक्काम या झोपड्यातच असतो.एकोप्याची भावना वाढविणे, घरांची साफसफाई करणे, निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे असा उद्देश यामागे असू शकतो.