कुरुंदवाड : महापुराने जिल्ह्यास राज्यातील अनेक भागांत अतोनात नुकसान झाले आहे. आघाडी सरकारने पूरग्रस्तांसाठी निधीची घोषणा केली आहे. निधी कमी वाटल्यास आणखीन निधी उपलब्ध करण्याची तयारी सरकारने ठरविले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांनी या संकटाने धीर सोडू नये. सरकार आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी दिला.
शहरातील दलित वस्तीतील पूरग्रस्त कुटुंबांची आस्थेवाईकपणे विचारणा करून प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी ते समाजमंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई शहराध्यक्ष भाई जगताप यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू दिली जात असली तरी ती मदत नसून पक्षाकडून मानवतेच्या भावनेतून कर्तव्य पार पाडत असल्याचेही हंडोरे यांनी सांगितले.
यावेळी गौतम ढाले, रामदास मधाळे, जय कडाळे, डी. पी. कांबळे, नगरसेवक अनुप मधाळे, माजी उपनगराध्यक्षा अर्चना ढाले, गिरीधर मधाळे, दीपक कांबळे, शिशुपाल ढाले, अलका मधाळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - १३०८२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे काँग्रेस पक्षाकडून आलेले पूरग्रस्तांसाठीचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. यावेळी रामदास मधाळे, गौतम ढाले, नगरसेवक अनुप मधाळे, डी. पी. कांबळे आदी उपस्थित होते.