कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण दिल्याची जाहिरात करण्यापेक्षा राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये मदत करावी असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार ६० कोटी रुपयांची जाहिरात करत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर सरकारने अशाप्रकारे खर्च केला असेल तर ते चुकीचे आहे, असे संभाजीराजे म्हणाले. त्यांनी या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षण आम्ही दिले असे सरकार अजून म्हणू शकत नाही. हे आरक्षण न्यायालयात टिकेल तेव्हा ते आरक्षण आम्ही दिले असे म्हणणे योग्य आहे.आम्ही आरक्षण दिले असे म्हणण्यापेक्षा सरकारने अशाप्रकारे गरीब मराठा समाजाची जाहिरातीच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय कसे देणार हे सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून सांगितले असते तर ते योग्य झाले असते. तेव्हा जाहिरात देण्यास आमची काही हरकत नसती, तुम्ही आरक्षण दिलं असेल तर ती तुमची जबाबदारीच आहे, त्यासाठी जाहिरात करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल राग नाहीशिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेले आहे. सर्व देशांच्या राजदूतांना पुढील वर्षीपासून या सोहळ्यासाठी निमंत्रण देउ असे संभाजीराजे म्हणाले. या सोहळ्यासाठी सामान्य शिवभक्त हाच सेलिब्रेटी असेल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल या क्षणी कोणताही राग नाही असे संभाजीराजे म्हणाले. रायगडावर शिवभक्त वाढत आहेत, त्यामुळे सरकारनेही योग्य ते निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाची जाहिरात देण्यापेक्षा.., संभाजीराजेंचे सरकारला आवाहन
By संदीप आडनाईक | Published: May 31, 2024 3:56 PM