लोकमत न्यूज नेटवर्क
रुकडी माणगांव : महापुराने शेतकरीची वाताहात झाली असून हे आपत्कालीन संकट शासनास कळत नाही का? पूरग्रस्तांना तत्काळ मदत किती दिवसात देणार असा थेट सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी रूकडी येथे आक्रोश शेतकऱ्यांचा परिक्रमा पंचगंगेचा या पदयात्राप्रसंगी केले.
रूकडी येथे अंबाबाई मंदिर मध्ये पदयात्रा आले असता तेथे सभेत रूपातंर झाले. शेट्टी म्हणाले, पंचगंगेचा पूर ओसरून सव्वा महिना झाला पण अद्यापही मदत मिळेना; मग तत्काळ मदत म्हणायची कशाला? केंद्र सरकारने आपत्कालीन मदतीसाठी निधी आयोगाची स्थापना केली. केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करत असताना आपत्कालीन निधी या आयोगाकडे वर्ग करत असते. केंद्र सरकारने आपत्कालीन निधीमधून महाराष्ट्राला मदत अद्यापही दिलेला नाही. मग महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. पदयात्रेत जि.प. सदस्या वंदना मगदूम ,डॉ. पद्माराणी पाटील, अशोकराव माने, पं.स. सदस्य पिंटू मुरूमकर, संदीप कारंडे , माजी उपसभापती अरुण मगदूम, माजी सभापती राजेश पाटील,सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, जवाहरचे संचालक जिनगोंडा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, रमेश कांबळे, जमीर मुजावर, महादेव कोळी , मुडशिंगीचे संतोष जाधव, ॲड. सुरेश पाटील, माजी उपसरपंच अमित भोसले, ग्रा.पं. सदस्य विजय पाटील शीतल देसाई ,अमित खोत, अभिनंदन खोत सामील होते
.............
पदयात्रा आवाडे गटाकडून हायजॅक
आक्रोश शेतकऱ्याचा परिक्रमा पंचगंगेचा ही यात्रा चोकाक येथे मुक्कामी आले असता यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांना जेवणापासून ते रूकडी येथून चिंचवाड येथे पोहचवूपर्यंत आवाडे गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन-चार महिन्यांनंतर होणारे जि.प व पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार या पदयात्रेला आवर्जून उपस्थित होते.