शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पाणीटंचाई निधीकडे शासनाची ‘वक्रदृष्टी’

By admin | Published: December 07, 2015 12:48 AM

निधीला कात्री : पावसाळा सुरू झाल्यानंतर कामे होतात सुरू

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर पाणीटंचाईच्या निधीकडे शासनाची ‘वक्रदृष्टी’ आहे. प्रत्येक वर्षी निधीला कात्री लावल्यामुळे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरून कोटींचा आराखडा तयार केला जातो. पैसे मिळताना मागणी केल्यापेक्षा निम्मेच मिळत असतात. तेही जून महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाल्यानंतर दिले जातात. परिणामी आराखडा कागदावरच राहतो. संबंधित गावांची तहान वरुणराजा भागवतो. शासकीय यंत्रणा निर्धास्त होते. गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे चित्र कायम आहे. प्रत्येक वर्षी आॅक्टोबर ते जानेवारी आणि जानेवारी ते जून अशा दोन टप्प्यांत टंचाई आराखडा तयार केला जातो. प्रत्येक तालुक्यातील आराखडा संबंधित आमदारांच्या सहीने पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे येतोे. जिल्हा परिषद अहवाल एकत्र करून जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन शासनाकडे सादर केला जातो. अन्य जिल्ह्णांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्णात पाऊस चांगला होत असतो. त्यामुळे प्रशासन जानेवारी अखेरपर्यंत आराखडा तयार करत नाही. यंदा जिल्ह्णात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. अनेक गावांत टंचाईच्या झळा पोहोचत आहेत. त्यामुळे नुकताच यंदाचा आराखडा पूर्ण झाला आहे. जिल्ह्णाच्या त्या आराखड्यात २१८ गावे आणि ३८९ वाड्या- वस्त्यांत उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ५ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांची मागणी केली आहे.आराखड्याची पुन्हा छाननी होणार आहे. स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावामुळे काही अनावश्यक कामे घुसडलेली असतात. ही सर्व कामे कमी करून वस्तुस्थिती पाहून गरज असलेल्या कामांचा सुधारित आराखडा निधीसाठी शासनाकडे पाठविणात येणार आहे. निधी मिळण्यास जून महिना उजाडतो. निधी विलंबाने मिळत असल्याने मंजूर कामेही होत नाहीत. जूनअखेरचा जिल्ह्णाचा टंचाई आराखडा तयार झाला आहे. मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून निधीसाठी शासनाकडे पाठविला जातो. उपाययोजनेची कामे करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे निधी आल्यानंतर त्वरित कामे सुरू केली जातील.- एस. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता, ग्रामपंचायत पाणीपुरवठा, जिल्हा परिषद