शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

Gram Panchayat Election: कोल्हापुरातील उजळाईवाडीत महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 11:55 AM

उचगाव : उजळाईवाडी (ता.करवीर)  येथे ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात असलेल्या महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर अज्ञात तिघा तरुणांनी दुचाकी घालून हल्ला ...

उचगाव : उजळाईवाडी (ता.करवीर)  येथे ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात असलेल्या महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर अज्ञात तिघा तरुणांनी दुचाकी घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत ते किरकोळ जखमी झाले. आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसात तिघा अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरानंतर गावात एकच खळबळ उडाली. जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी उद्या, रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबत माहिती अशी की, उमेदवार महिलेचे पती पहाटेच्या सुमारास दारात उभे होते. दरम्यान भरधाव वेगात आलेल्या अज्ञात तिघा तरुणांनी त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून ते बाजूला झाले. यावेळी तरुणांनी शिवीगाळ करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत ते रस्त्यावर फरपटत गेल्याने किरकोळ जखमी झाले. हल्लेखोर तरुण मात्र पसार झाले. याघटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेत तक्रार दाखल करुन घेतली. हल्लेखोर तरुणांचा पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक