सत्ता गावाची... सत्ता मतदारराजाची...
निवडणूक कोणतीही असली तरी ती कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चुरशीनेच लढवली जाते. त्याचेच प्रत्यंतर शुक्रवारी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही आले. सर्वच गावांत रांगा लावून आणि ईर्षेने लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील प्राथमिक शाळेत सकाळी ९ वाजताच अशा रांगा लागल्या होत्या. (आदित्य वेल्हाळ)
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन १५
कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी चुरशीने मतदान झाले. उमेदवारांइतकाच मतदारांतही कमालीचा उत्साह होता. सकाळी मतदान करून शेतीच्या कामासाठी जायची लगबग होती. त्यामुळे सकाळी १० वाजेपर्यंत अनेक गावांमध्ये मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदारांतील उत्साह दर्शवणारी ही रांग कोगे (ता. करवीर) येथील आहे. (आदित्य वेल्हाळ)
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन ०५
मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी अनेक गावांत मतदारांना निवडणूक कर्मचाऱ्यांनी अशी मतदान यंत्राचीही माहिती दिली.
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन ०६ व १७
ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने आपल्या गटाला एकेक मतदान कसे होईल, यासाठी यंत्रणा राबविण्यात आली. त्यामुळे आजारी, वयोवृद्ध मतदारांनाही असे मतदानासाठी आणण्यात आले. (आदित्य वेल्हाळ)
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन ०७ व १९
आपल्याला एक मत जास्त कसे पडेल यासाठी उमेदवारांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले. त्यामुळेच मतदानासाठी निघालेल्या मतदारराजाला वाकून नमस्कार करण्यातही उमेदवार पुढे राहिले. (आदित्य वेल्हाळ)
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन ०८
निवडणुकीत सर्वच गावांत कमालीची चुरस होती; परंतु मतदानादिवशी हळदी (ता. करवीर) येथे सर्व महिला उमेदवार अशा एकाच रांगेत आणि त्याही उन्हात बसल्या होत्या.
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन ०९ व १०
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महिलांचाही उत्साह ओसंडून वाहत होता. अगदी सण असल्यासारख्या महिला मतदानाला नटूनथटून आल्या होत्या, असे चित्र अनेक गावांत दिसले. कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे (ता. करवीर)मध्ये मतदानासाठीही महिलांची अशी लांबलचक रांग लागली होती. (आदित्य वेल्हाळ)
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन ११
मतदारांना ने-आण करण्यासाठी सर्वच गावांत राजकीय पक्षांकडून असा सर्रास वापर झाला. त्यामुळेच मतदानाची टक्केवारीही वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे (ता. करवीर) येथील दृश्य.
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन १२ व १३
गावे मोठी आणि चुरस जास्त, तेवढ्या रांगा लांबच्या लांब, असे चित्र शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गावांत दिसले. करवीर तालुक्यातील खुपिरे येथे मतदानासाठी सकाळी १० वाजेपर्यंत असे चित्र होते. (आदित्य वेल्हाळ)
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन १४
संवेदनशील गावामध्ये लोकांनी मतदान केंद्राजवळ अनावश्यक गर्दी करू नये, असे गावकामगार तलाठी मेगा फोनवरून सांगत होते.
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन १६
कोगे (ता. करवीर) येथील ताराबाई यादव या नव्वद वर्षांच्या माउलीने नातवाच्या गाडीवरून येऊन मतदान केले.
१५०१२०२१-कोल-ग्रामपंचायत इलेक्शन १८
पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील नानासाहेब दादू पाटील यांनी मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर अशी पोज दिली. (आदित्य वेल्हाळ)