कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या १५ हजार ८३० उमेदवारी अर्जांपैकी १८७ उमेदवारी अर्ज गुरुवारी झालेल्या छाननीत अवैध ठरले. आता निवडणुकीसाठी १५ हजार ३७७ अर्ज वैध असून, सोमवारपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्याचदिवशी निवडणुकीच्या रणधुमाळीत असलेल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होईल.कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, पाच दिवसांत बारा तालुक्यांतील ४ हजार २७ सदस्य संख्येसाठी १५ हजार ८३० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी गुरुवारी करण्यात आली. या छाननीत १८७ अर्ज अवैध ठरले. यात कागल तालुक्यातील सर्वाधिक ५१ आणि त्यानंतर करवीरमधील ४७ अर्जांचा समावेश आहे. माघारीसाठी सोमवारपर्यंतचा दिवस असून, त्याचदिवशी चिन्ह वाटप होणार आहे.तालुक्याचे नाव : वैध अर्ज : अवैध अर्ज
- शाहूवाडी : ७४४ : ९
- पन्हाळा : १ हजार ३७१ : ७
- हातकणंगले : १ हजार १५ : १२
- शिरोळ : १ हजार ९३८ : १४
- करवीर : २ हजार ४११ : ४७
- गगनबावडा : २०५ : ०
- राधानगरी : ५५३ : ८
- कागल : २ हजार ६७५ : ५१
- भुदरगड : १ हजार २४५ : १२
- आजरा : ६६२ : ५
- गडहिंग्लज : १ हजार ५५३ : ८
- चंदगड : १ हजार ५ : १४