शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

ग्रामपंचायत- कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 1:40 PM

Grampanchyat Election Voting- राज्यातील महाविकास आघाडी सरकारची गावपातळीवरची पहिली लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरु झाले. सर्वत्र मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे जाणवत होते. दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देग्रामपंचायत- कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान ३८६ ग्रामपंचायतींसाठी मतदारांच्या रांगा : ग्रामीण भागात महिलांचाही उत्साह

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची गावपातळीवरची पहिली लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरु झाले. सर्वत्र मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे जाणवत होते. दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही मोठी खबरदारी घेतली आहे. शारिरिक अंतर ठेवून मतदार मतदान करत होते. बहुतांश केंद्रांवर थर्मल स्कॅनरने मतदारांची तपासणी केली जात होती. याशिवाय सॅनिटायझरचा वापर केला जात होता. अनेक कर्मचाऱ्यांनी फेसशिल्ड, मास्कचा वापर केला.जिल्ह्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींमध्ये १५५३ केंद्रावर मतदान सुरु झाले. ४७ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत, त्यामुळे उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी गेल्या महिनाभरापासून गावागावांत राजकीय धुळवड उडाली. ८ लाख ५६ हजार मतदार असून नवे ३ हजार ३०७ सदस्यांची निवडणुकीतून कारभारी निवडले जातील.आज सकाळी सकाळी ७.३० वाजताच मतदार प्रचंड संख्येने रांगा लाउन मतदान करताना दिसले. निवडून येण्यासाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी खास यंत्रणा लावण्यात आली आहे. मतदानादिवशीच किंक्रांत आल्यामुळे राजकीय धुळवड उडाली आहे.कागल तालुक्यातील बिद्री येथील मतदान केंद्रांवर महिलांनीही मोठ्या हिरीरीने सकाळीच रांगा लाउन मतदान केले. हीच स्थिती मळगे, शिंदेवाडी येथील मतदान केंद्रावर होती. हातकणंगले तालुक्यातील मिणचे, वाठार, पन्हाळा तालुक्यातील पोंबरे, पोर्ले, कोडोली येथील यशवंत हायस्कूल, शिये ता.करवीर येथील केंद्रावर, भुदरगड तालुक्यातील आदमापूर, लक्षवेधी खानापूर आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे रांगा लागल्या होत्या. करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथील युवतींनी मतदानाचा प्रथमच हक्क बजावला. या केंद्रावर डीवायएसपी प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली.संवेदनशील केंद्रांवर शांततेत मतदानसंवेदनशील असलेल्या हातकणंगले तालुक्यातील दरवेश पाडळी येथील केंद्रावर शांततेत मतदान झाले.ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही ठिकाणी गोंधळआमदार पी. एन. पाटील यांचे गाव असलेल्या करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान केंद्रावर मतदान सुरु होण्याच्या वेळेतच ईव्हीएम मशीन बंद पडले होते. सकाळी या मशीनची चाचणीच घेण्यात न आल्याने हा प्रकार घडला. ९ वाजेपर्र्यत मशीन सुरु झाले नव्हते. यामुळे अनेक मतदारांनी घरी परतणे पसंत केले. बाचणी, ता. करवीर येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडल्याने गोंधळ उडाला.या केंद्रावर गोंधळयमगे येथे मतदान केंद्रावरचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने अपंग आणि आजारी मतदारांनी परत जाणे पसंत केले.यावेळी पोलिसांशी वादावादी झाली तर कोपार्डे येथेही बोगस मतदानावरुन वादावादी झाली.यांनी केले मतदानपन्हाळा तालुक्यातील निवडे येथे सुंदाबाई नाना चव्हाण या १0९ वर्षांच्या वृध्देने मतदान केले तर यड्राव येथील ताराबाई बाबू निर्मळ या ९५ वर्षांच्या वृध्देने आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांना महेश निर्मळ व धीरज ठाणेकर यांनी सहकार्य केले.मतदानासाठी जनजागृतीअंधश्रध्दा निर्मुलन समितीचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष दिनकर चौगुले यांनी मोटारसायकलवरुन निवडणुकीसाठी अंधश्रध्दा बाळगू नयेत यासाठी जनजागृती सुरु केली होती. आदमापूर येथे मतदान केंद्राबाहेर जनजागृतीसाठी रांगोळी काढण्यात आली होती.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदानkolhapurकोल्हापूर