इंदुमती गणेश,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महिला उमेदवारांची सरशी झाली आहे. जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींमधून २ हजार ९३ महिला उमेदवार निवडून आल्या असून, ही संख्या विजयी पुरुष उमेदवारांच्या तुलनेत १५९ने जास्त आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये महिला कारभारीच ग्रामपंचायतीचा डोलारा सांभाळणार आहेत.
जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १८ जानेवारीला मतमोजणी झाली. राज्यात महाविकास आघाडीचे राज्य असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व राहिले. या निवडणुकीत ४ हजार २७ गावकारभारी निवडले गेले. यापैकी २ हजार ९३ महिला आहेत तर १ हजार ९३४ पुरुष आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या १५९ने जास्त आहे.
----
गावात स्वच्छतेचा अभाव आहे, गाव स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन, त्याची योग्य विल्हेवाट हा विषय प्राधान्याने घेणार आहे. शासकीय योजनेतून दलित वस्तीसह गरिबांना घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावात पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याने या पाण्यावर प्रक्रिया करुन ते शुद्ध करण्याचा प्रकल्प हाती घेणार आहे.
चित्रा सुतार (नृसिंहवाडी) (फोटो-२२०१२०२१-कोल-चित्रा सुतार ग्रामपंचायत)
---
गावात सातवीपर्यंत शाळा आहे. तिथून पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर दुसऱ्या गावात पायपीट करत जावे लागते. अशातच अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटते. त्यामुळे गावातील शाळा दहावीपर्यंत करण्याची इच्छा आहे. ग्रामपंचायतीची इमारत खूप जुनी असून, तिला गळती लागली आहे. ही इमारत नव्याने बांधायची आहे. अंतर्गत रस्ते, पाणी, गावची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन यावर काम करायचे आहे. शासनाच्या योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
उज्ज्वला कांबळे (उंड्री, ता. पन्हाळा)
फोटो नं २२०१२०२१-कोल-उज्ज्वला कांबळे (ग्रामपंचायत)
--
ग्रामप्रशासनातील गोंधळामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे आधी ग्रामप्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न असेल. रोजगारासाठीचे तरुणांचे स्थलांतर थांबवून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेती उत्पादनांना थेट बाजारपेठ, छोट्या-मोठ्या व्यवसायांना बँका-फायनान्स कंपन्या, सहकारी संस्था व पतपेढ्या यांच्यामार्फत कर्ज मिळवून देण्यासाठी काम करायचे आहे.
पल्लवी पाटील (शित्तूर तर्फ वारुण, ता. शाहुवाडी )
फोटो नं २२०१२०२१-कोल-पल्लवी पाटील (ग्रामपंचायत)
--
करवीर तालुक्यात महिलांचे वर्चस्व
जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी करवीर तालुक्यात महिला उमेदवारांची सर्वाधिक संख्या आहे. येथे २७९ महिला विजयी झाल्या असून, त्यानंतर कागल (२६९), शिरोळ (२२८) या तालुक्यांचा नंबर लागतो.
---------
तालुकानिहाय विजयी महिला उमेदवार
तालुका : विजयी महिला उमेदवार
राधानगरी : ६१
आजरा : ८९
गगनबावडा : ३५
कागल : २६९
हातकणंगले : १४०
करवीर : २७९
गडहिंग्लज : २१७
शिरोळ : २२८
पन्हाळा : २०६
शाहुवाडी १८२
भुदरगड : १९५
चंदगड : १९२
--