२) गिरगाव (ता. करवीर) येथे विजयी महिलांच्या पतींनी त्यांना उचलून घेऊन आनंदोत्सव साजरा केला. (फोटो-१८०१२०२१-कोल-ग्रामपंचायत०१)
३) देवा धन्यवाद... बालिंगे (ता. करवीर) येथे अत्यंत अटीतटीच्या लढतीत बाजी मारल्यानंतर एका उमेदवाराने देवाचे आभार मानले. त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. (फोटो-१८०१२०२१-कोल-ग्रामपंचायत०२ व ०३)
४) विजयानंतर समर्थकांनी मोजणी केंद्राबाहेर असा जल्लोष केला. (फोटो-१८०१२०२१-कोल-ग्रामपंचायत०४)
५) जिंकलो रे... मतमोजणी केंद्रातून विजयावर शिक्कामोर्तब करून जल्लोष करतच प्रतिनिधी बाहेर येत होते. (फोटो-१८०१२०२१-कोल-ग्रामपंचायत०५)
६) गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे संघर्षपूर्ण लढतीत तानाजी पाटील यांनी गड राखल्यानंतर मोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी त्यांना उचलून घेऊन आनंदोत्सव साजरा केला. (फोटो-१८०१२०२१-कोल-ग्रामपंचायत०६)
७) करवीर तालुक्यात सर्वच ठिकाणी चुरशीच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्कंठा होती. मोजणी केंद्राबाहेर अशी ‘हुरहूर, चिंता आणि घालमेल’ पाहायला मिळत हाेती. (फोटो-१८०१२०२१-कोल-ग्रामपंचायत०७)
( सर्व छाया- नसीर अत्तार)