शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

रेंदाळमधील जागेचा निर्णय ग्रामसभेत घेणार

By admin | Published: October 09, 2015 12:12 AM

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक : केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रासाठी जादा संपादन

हुपरी : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे नियोजित केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रासाठी संपादित करण्यात येत असलेल्या शासकीय गायरानबाबत चर्चा करून जनमत जाणून घेण्यासाठी तहसीलदार दीपक शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये काहींनी अनुकूलता दर्शविली, तर बहुतांश जणांनी शासकीय गायरान गावठाण वाढीसाठीच आरक्षित करावे, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे याप्रश्नी ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये खास गावसभा घेऊन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. रेंदाळ येथील गट नंबर ९८५ मध्ये सुमारे दीडशे एकर शासकीय गायरान अस्तिवात आहे. याच गायरानातून दूधगंगा धरणाचा कालवा गेल्याने खुदाईमध्ये साधारण ४० एकर जमीन गेल्याने शंभरभर एकर जमीन शिल्लक राहिली आहे. या जमिनी व्यतिरिक्त भविष्यातील गावठाणवाढ करण्यासाठी दुसरी जागाच शिल्लक नाही, अशी वस्तुस्थिती असतानांही याच गायरानातील सर्वच जागा नियोजित ‘केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रासाठी’ संपादित करण्याचा घाट जिल्हा प्रशासनाने घातला आहे. याप्रश्नी शासनाची भूमिका समजावून सांगण्यासाठी तहसीलदार दीपक शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची खास बैठक घेऊन शासनाचा निर्णय सांगितला. यावेळी सरपंच अश्विनी कांबळे, उपसरपंच अभिषेक पाटील, पंचायत समितीचे सदस्य शिवाजी पुजारी, माजी सरपंच शिवाजी पाटील, अ‍ॅड. महिपती पाटील, राजू नाईक, कृष्णात पुजारी, शिवाजी गावडे, प्रकाश केळीकर, राजेंद्र कोल्हापुरे, संजय शिंगाडे, महेश कोरवी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)काहींची अनुकूलता,तर काहींचा विरोधकाहींनी शासनाच्या निर्णयाला अनुकूलता दर्शविली, तर बहुतांश पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. गोंधळामुळे याप्रश्नी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये खास गावसभा बोलावून ग्रामस्थांची भूमिका समजावून घेण्याचे ठरविले. तसेच तोपर्यंतच्या कालावधीमध्ये गट नंबर ९८५ची मोजणी करून घेऊन त्यासाठी शासकीय गायरान किती आहे. याची खात्री करून घेण्याचेही ठरविण्यात आले.