संजय गांधी निराधार योजनेच्या ७६० लाभार्थ्यांचे एक कोटी ४० लाख ५३ हजार रुपये, श्रावणबाळ योजनेतील एक हजार ५७९ लाभार्थ्यांचे एक कोटी ८६ लाख ७४ हजार रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील ४३ लाभार्थ्यांचे दोन लाख २५ हजार ७०० रुपये आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील ५९ लाभार्थ्यांचे अकरा लाख ८० हजार रुपये असे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.
कोरोनामुळे सन २०१९ पासून नवीन लाभार्थ्यांचे अनुदान थकीत होते. त्यामुळे प्राधान्यक्रमाने या लाभार्थ्यांना अनुदान मिळावे, यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांकडून प्रतिसाद मिळून अनुदान मिळाले आहे. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा झाली असली तरी लाभार्थ्यांनी शासन निर्बंधाचे पालन करण्यासह बँकेकडून प्राप्त सूचनेनुसारच अनुदान घेण्यासाठी जावे, असे आवाहन खंजिरे यांनी केले. पत्रकार परिषदेस संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, भाऊसाहेब आवळे, राजन मुठाणे, आदी उपस्थित होते.