विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या यांची शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तपासणी होऊन अनेक शाळा अनुदानास पात्र झालेल्या आहेत. मात्र, या परिस्थितीत शासनाने शाळा व तुकड्या तपासणीचा आदेश काढल्याने शिक्षण संस्थांमध्ये अस्वस्थता आहे. हा आदेश रद्द करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. या सर्व शाळांना अनुदान देण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
शपथविधीनंतर लगेच कामात
प्रा. जयंत आसगावकर हे पुणे शिक्षक मतदारसंघातून शुक्रवारी (दि. ४) विजयी झाले. त्यानंतर मंगळवारी (दि. ८) आमदारची शपथ घेतल्यानंतर लगेचच म्हणजे दुसऱ्या दिवशी शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांचा पाठपुरावा सुरू केला.
फोटो ओळी : शाळा तपासणी आदेश रद्द करून अनुदान द्यावे, या मागणीचे निवेदन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केले. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. (फोटो-०९१२२०२०-कोल-आसगावकर)
- राजाराम लोंढे