शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

साखर निर्यातीसाठी दोन दिवसांत अनुदान

By admin | Published: February 09, 2015 1:01 AM

सहकारमंत्र्यांची माहिती : प्रभाकर देशमुख यांचे आंदोलन स्थगित

कोल्हापूर : साखर निर्यातीसाठी प्रतिटन चार हजार रुपये अनुदान येत्या दोन दिवसांत कारखान्यांंना देणार असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. या अनुदानाबाबत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करुन त्यांची मान्यता मिळाली आहे. मंत्री पाटील यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करत असल्याचे प्रभाकर भैया देशमुख यांनी सांगितले. चालू गळीत हंगामातील उसाला एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याने कर्जे व्याजाने फुगली आहेत. कापूस उत्पादकांप्रमाणे ऊस उत्पादकही आत्महत्या सुरू करतील. यासाठी केंद्र सरकारने देऊ केलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंत्री पाटील यांच्या दारात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर मंत्री पाटील व देशमुख यांच्यात रविवारी चर्चा झाली. साखरेचे दर घसरल्याने हा पेच निर्माण झाला आहे, परिणामी राज्य बँकेकडून कारखान्यांना कमी उचल मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांकडे पैसे नाहीत. जागतिक बाजारपेठेतही साखरेचे दर कमी आहेत, यासाठी निर्यात अनुदान देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. त्याला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मान्यता मिळाली असून येत्या दोन दिवसांत टनाला चार हजार रुपये अनुदान कारखान्यांना मिळणार आहे. त्यामुळे क्विंटलमागे चारशे रुपये जादा मिळणार असल्याने एफआरपी देण्यास मदत होणार आहे. तुमच्याप्रमाणे आम्हालाही शेतकऱ्यांची स्थिती समजते, सरकारचा गाडा रुळावर आणण्यासाठी मुख्यमंत्री २३ तास काम करतात, आंदोलन करू नका, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. बबु्रवान गोरे, संदीप देशमुख, पप्पू पाटील, दत्तात्रय जाधव उपस्थित होते. ठिय्या मारणार सरकार काहीच करत नसेल तर आंदोलन करा, पण प्रयत्न सुरू असताना आंदोलन करू नका. माझ्या घरासमोर ठिय्या मारणार असाल तर मी मुंबईला जात नाही, घरीच थांबतो, असे मंत्री पाटील यांनी देशमुख सांगितल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले.