राजाराम लोंढे -- कोल्हापूर --पाणीटंचाईच्या झळा केवळ पिकांना सहन कराव्या लागत नाहीत, तर त्याचा परिणाम वाड्या-वस्त्यांवरील जनावरांच्या दूध उत्पादनासह आरोग्यावर झाला आहे. सुक्या चाऱ्यामुळे शरीराला पाण्याची गरज जास्त असते, त्यात जीवघेण्या उष्म्याने तर दिवसातून चारवेळा पाणी दिले तरी ते जनावरांच्या दृष्टीने कमीच असते. वाड्या-वस्त्यांवर माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तिथे जनावरांचे काय? याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला असून जिल्ह्याच्या दूध संकलनात गत महिन्यापेक्षा सुमारे वीस हजार लिटरने घट झाली आहे. कोल्हापूर जिल्'ात शेतीला जोडधंदा म्हणून उद्यास आलेल्या दूध व्यवसायाने अलीकडील दहा वर्षांत प्रमुख व्यवसाय म्हणून मान्यता मिळविली आहे. बेभरवशाच्या शेतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दूध व्यवसायाने आधार दिला. दहा दिवसाला न चुकता दुधाचे पैसे हातात येत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यात या व्यवसायाचा खूप मोठा वाटा आहे. जिल्'ात ११ लाख ५४ हजार गाय , म्हैस वर्ग जनावरे व शेळ्या-मेंढ्या आहेत. जिल्'ात प्रामुख्याने ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘शाहू’च्या माध्यमातून सरासरी १५ लाख लिटर दूध संकलन सुरू आहे. पाणीटंचाईमुळे उसासह इतर पिके जाणार हे निश्चित आहे, त्यात दूध व्यवसायही अडचणीत आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्'ात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका गंभीर नसला तरी वाड्या-वस्त्यांवर जिथे जिवंत झऱ्यांवर पाणीपुरवठा अवलंबून आहे, तिथे प्रश्न गंभीर बनला आहे. झरे व लहान तळी आटल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात वाड्या-वस्त्यांवर सुका चाराच जनावरांसाठी आता उपलब्ध आहे. सुका चारा व पुरसे पाणी नसल्याने दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. (उत्तरार्ध)‘गोकुळ’चे गत महिन्यापेक्षा दूध कमीच‘गोकुळ’ चे गत वर्षीपेक्षा यंदा सरासरी दूध संकलन जास्तच दिसते, हे जरी खरे असले तरी यंदा संकलन वाढीसाठी संघाने विविध कार्यक्रम राबविल्याने सुरुवातीपासूनच संकलनात वाढ दिसते. गत महिन्याच्या तुलनेत पाहिले तर त्यांचे दहा हजार लिटर तर ‘वारणा’ व इतर संघाचे संकलनावर दुष्काळाचा परिणाम दिसतोच.
दूध उत्पादनात मोठी घट
By admin | Published: April 29, 2016 12:06 AM