येथील तुकाराम कोलेकर वरिष्ठ महाविद्यालयात संस्था संचालिका डॉ. अर्चना कोलेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर होते. यावेळी डॉ. डी. के. कांबळे, संगीता लोखंडे, एस. बी. चौगुले, आदी उपस्थित होते.
नेसरी पत्रकार संघ कार्यालयात डी. एम. पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. प्रल्हाद माने यांनी स्वागत केले. विजय गुरबे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र हिडदुगी यांनी सूत्रसंचालन केले. अर्जुन भिंगुडे यांनी आभार मानले.
शिवाजीराव मगर, आप्पासाहेब कुंभार, अमोल बागडी, आदी उपस्थित होते.
नेसरी येथील फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच व जयभीम समाजातर्फे सरपंच आशिषकुमार साखरे यांच्या हस्ते गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व धम्मवंदना झाली. प्रकाश गुरव यांनी प्रास्ताविक केले.
ग्रा. पं. सदस्य रामचंद्र परीट व विनायक कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक पांडव यांनी मनोगत व्यक्त केले.
कबीर वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. रामकृष्ण गुरव यांनी आभार मानले. यावेळी नागोजी कांबळे, रौफ मुजावर, खाजुद्दीन ताशिलदार, अमृता बागडी, गीता बुरुड, कार्तिक कालेकर, विलास हल्याळी, दत्ता बागडी, प्रशांत नाईक, एच. एस. कुचेकर, जे. के. ससाणे, टी. बी. कांबळे, शिवाजी सावंत, श्रावण कांबळे, कृष्णा कांबळे, भैरू कांबळे, अजित कांबळे, रवी भोसले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
नेसरी ग्रामपंचायत, हेब्बाळ जलद्याळ, बटकणंगले, शिप्पूर, अर्जूनवाडी, सांबरे, आदी गावांमध्ये डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.