कोल्हापूर : तबल्यावरील ताल, तोडे आणि सरोद वादनाच्या मंजूळ स्वरांतून सोमवारी तबला विभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांना अभिवादन करण्यात आले. निमित्त होतं बाबासाहेब मिरजकर स्मृती समारोहचे.शाहू स्मारक भवनात बाबासाहेब मिरजकर यांचे शिष्य अतुल ताडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गायक पंडित चंद्रकांत लिमये, हेमसुवर्णा मिरजकर, प्रसाद बुरांडे, शामराव सुतार, महेश पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब मिरजकर यांच्यावर आधारित ‘आवर्तन’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतुल ताडे यांचे शिष्य प्रथमेश शिंदे व प्रसाद सोनटक्के यांनी तबला जुगलबंदी सादर केली. ताल तीनमधील या जुगलबंदीनंतर अमोल चांदेकर व जीतेंद्र भोसले यांचे ‘एकल तबलावादन’ झाले. त्यांना गजानन सुतार यांनी ‘लेहरा’ साथ दिली. या एकल तबलावादनानंतर पंडित शेखर बोरकर यांचे शिष्य अभिषेक बोरकर यांचे ‘सरोदवादन’ झाले. अतुल ताडे यांनी तबला साथ केली. परेश तेरडे यांनी सूत्रसंचालन केले.