कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या भूमिपूजनानिमित्त शनिवारी भारतीय जनता पार्टी, अल्पसंख्याक आघाडी, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे छत्रपती शिवाजी चौक व बिंदू चौक येथे नागरिकांना साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.मुंबई येथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या भूमी आणि जल पूजनाचा कार्यक्रम झाला. या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे बिंदू चौक येथे शिवस्मारकाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाचे एल.ई.डी. स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. या ठिकाणी पक्ष कार्यकर्ते, शिवप्रेमी व नागरिकांची गर्दी झाली होती. भाजप ज्येष्ठ नेते व गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई, विजय जाधव, संतोष भिवटे, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, गणेश देसाई, हितेंद्र पटेल, सयाजी आळवेकर, गिरीष गवंडी, गुरुनाथ भुयेकर, अरविंद शिंदे, नझीर देसाई, तौफिक बागवान, ईकबाल हकीम, अमित माळी, आदी उपस्थित होते.दरम्यान, छत्रपती शिवाजी चौक येथे भाजप अल्पसंख्याक आघाडी व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना साखर, पेढे वाटप करण्यात आले. यावेळी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नजीर देसाई, तौफिक बागवान, इक्बाल हकीम, फिरोजखान उस्ताद, कादर मलबारी, फारुक कुरेशी, महंमद शेख उपस्थित होते.माती, जलकुंभ कलश सुपूर्दजिल्ह्यातील विविध गडकोटांवरून शिवपदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचे संकलन व नद्यांचे पवित्र जल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित केले. हे माती व जल असलेले कलश शुक्रवारी मुंबई येथे आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटन मंत्री बाबा देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, नगरसेवक विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, विजय खाडे-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
भाजप, मुस्लिम ब्रिगेडतर्फे आनंदोत्सव
By admin | Published: December 25, 2016 1:08 AM